53rd IFFI 2022: दिव्यांगासाठी चित्रपटाचे विशेष सादरीकरण…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी दिव्यांग व्यक्तींना सहभागी होता यावे यासाठी काही विशेष उपक्रम घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दिव्यांगांसाठी दृकश्राव्य माध्यमातून अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचा प्रीमियर यावेळी करण्यात आला. यासाठी दिव्यांगजन असा विशेष विभाग करण्यात आला आहे. यात ‘गांधी’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे.
हेही वाचाः53rd IFFI 2022: सिनेमात महिलांची प्रतिमा बदलण्यासाठी शिक्षण गरजेचे…
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर यांनी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, वेगळ्या शैलीतील चित्रपटांसह नव्या उपक्रमांची सुरुवात केल्यामुळे यावर्षीचा इफ्फी उठावदार झाला आहे. दरम्यान, समाजातील सर्व घटकांना चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला पाहिजे अशी इच्छा नागराज मंजुळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव तहा हझिक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
हेही वाचाःकुत्रा आडवा आल्याने अपघात; महिलेचा गेला नाहक जीव…