53rd IFFI 2022: ‘फिल्मबाजार’मध्ये यावर्षी झाले २४७ सिनेमांचे प्रदर्शन…

६ दुर्मीळ भाषांच्या सिनेमांचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या फिल्मबाजारमध्ये यंदा भारतासह दक्षिण आशियातील २४७ सिनेमांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये दुर्मीळ होत असलेल्या सहा भाषांच्या चित्रपटांचाही समावेश आहे.
हेही वाचाः53rd IFFI 2022: दिव्यांगासाठी चित्रपटाचे विशेष सादरीकरण…

‘या’ दुर्मीळ भाषांसह ३३ भाषांतील सिनेमांचा यामध्ये समावेश

कोडवा (कर्नाटक), कुल्लवी (हिमाचल प्रदेश), तंगखुल (मणिपूर), संथाली (पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा), बोडो (आसाम, मेघालय, बांगलादेश), चित्तगोनिअन (पश्चिम बंगाल, आसाम) या दुर्मीळ भाषांसह ३३ भाषांतील सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. यातील १७० चित्रपट हे ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ असलेले फिचर चित्रपट होते. तसेच १८ चित्रपटांचा कालावधी ३० ते ६० मिनिटांच्या दरम्यान होता. यामध्ये ५९ लघुपटही दाखविण्यात आले.
हेही वाचाःFrench Teacher Award : प्रा. क्षमा धारवाडकर यांना उत्कृष्ट फ्रेंच शिक्षक पुरस्कार प्रदान…

प्रथमच जगभरातील पॅव्हेलियन्स फिल्मबाजारमध्ये उभारण्यात आली

देश व जागतिक पातळीवरील चित्रपट निर्माते व संस्था यांच्यासाठी भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने फिल्मबाजारचे आयोजन करण्यात आले होते. २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या बाजारात यावर्षी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश यांची विशेष पॅव्हेलियन्स होती. निर्मिती क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी यंदा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. लेखकांसाठीही मार्गदर्शन सत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले. कोविडनंतर ओटीटीचा वाढता प्रभाव या विषयावर चर्चा करण्यात आली. यंदा प्रथमच जगभरातील पॅव्हेलियन्स फिल्मबाजारमध्ये उभारण्यात आली होती. 
हेही वाचाःतुयेतील श्री भगवतीचा २८ रोजी जत्रोत्सव…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!