IFFI 2021 | जबरदस्त ओपनिंग झालेल्या इफ्फीची शानदार फोटोस्टोरी

इफ्फीला आजपासून सुरुवात! जबरदस्त सिनेमांची मेजवानी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : 51 व्या इफ्फीची आज (शनिवार, 16 जानेवारी 2021) दणक्यात सुरुवात झाली. कोरोनामुळे लांबलेला इफ्फी अखेर आजपासून सुरु झालाय. गोव्याची शान असणाऱ्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्फीमध्ये जबरदस्त सिनेमांची मेजवानी चाहत्यांनी अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत अनेक सिनेकलाकारांनीही या शानदार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना जावडेकरांनी कोरोनाची लढाई भारत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की…

आपण सगळे कोरोनासारख्या महामारीसोबत लढत आहोत. मात्र मी तुम्हाला विश्वास देतो या लढाईत भारत जिंकेल आणि कोरोनाची हार होईल. येत्या नोव्हेंबरमध्ये इफ्फी २०२१ सर्वोत्कृष्टरित्या साजरा केला जाईल.

व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा, अभिनेता सुदीप संजीव, दिग्दर्शक प्रियदर्शन आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

हेही वाचा – गोवा विभागात झळकणार आहे हे खास सिनेमे

एका खुर्चीवर बसून जगाची सफर घडविण्याची क्षमता चित्रपटात आहे. चित्रपटाचे जग अनुभवता आले पाहिजे, असं मत अभिनेता सुदीप संजीव यांनी व्यक्त केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मर्यादित लोकांना उद्धाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलंय.

हेही वाचा – ‘ईफ्फी’च्या आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये या भारतीय दिग्दर्शकाचा समावेश

यावेळी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, सिद्धांत चतुर्वेदी, अनुपम खेर, अभिनेत्री विद्या बालन, माधुरी दीक्षित यांनी इफफीला डिजिटली शुभेच्छा दिल्या. गायिका सोनिया शिरसाट यांनी यावेळी गीत गायले तर गोमंतकीय कलाकारांनी समईनृत्य आणि इतर कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री तिस्का चोप्रानं केलं.

VIDEO | दृश्यम-2चा टीजर आलाय! काय सांगता अजून नाही पाहिला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!