पुन्हा पाचशेपेक्षा जास्त रुग्णांची भर! 97 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल

दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा 550च्या पार गेलाय. मंगळवारी दिवसभरात तब्बल 562 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 4 हजार 800च्या पार गेली आहे. मंगळवारी राज्यात 562 नवे रुग्ण आढळून आलेत, तर तिघांचा मृत्यू झालाय. राज्यातील सध्याच्या घडीला एकूण 4 हजार 888 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आणखी घसरला असून आता तो 90.94 टक्क्यांवर आला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानंही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसांत तब्बल 3502 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढ चिंताजनक मानली जाते आहे. तर 7 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 307 रुग्ण नव्यानं होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर एकूण 97 रुग्णांना नव्यानं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कोरोना रुग्णवाढीचा महाभयंकर वेग

मंगळवारी नवे 562 रुग्ण, तिघांचा मृत्यू
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 888
रिकव्हरी रेट घसरुन 90.94 टक्क्यांवर
मागच्या 7 दिवसांत तब्बल 3 हजार 502 नवे रुग्ण
मागच्या 7 दिवसांत 15 जणांचा मृत्यू

उत्तर गोव्यात पर्वरीत 460, तर दक्षिण गोव्यात मडगावमध्ये 523 सक्रिय रुग्ण आहेत. फोंडा आणि पणजीतील सक्रिय रुग्णसंख्याही तीनशेच्या पार गेली आहे. पणजीत 340 सक्रिय रुग्ण आहेत, तर फोंड्यात 369 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कुडतरी, वास्को, कांदोळी आणि म्हापशातील रुग्णवाढही चिंतेचा विषय ठरु लागली आहे.

पर्वरीत 460, तर मडगावमध्ये 523 सक्रिय रुग्ण
फोंडा, पणजीतील रुग्णसंख्या ३००च्या पार
पणजीत 340, तर फोंड्यात 369 सक्रिय रुग्ण

कुठे किती सक्रिय रुग्ण? (उत्तर गोवा)

डिचोली 113
साखळी 107
पेडणे 104
वाळपई 50
म्हापसा 330
पणजी 340
हळदोणा 86
बेतकी 34
कांदोळी 311
कासारवर्णे 12
कोलवाळ 68
खोर्ली 110
चिंबल 177
शिवोली 165
पर्वरी 460
मये 33

कुठे किती सक्रिय रुग्ण? (दक्षिण गोवा)

कुडचडे 63
काणकोण 82
मडगाव 553
वास्को 239
बाळ्ळी 44
कासावली 155
चिंचिणी 92
कुठ्ठाळी 275
कुडतरी 76
लोटली 66
मडकई 31
केपे 34
सांगे 92
शिरोडा 82
धारबांदोडा 60
फोंडा 369
नावेली 87

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!