१५ खासगी इस्पितळांना लसीकरणास मान्यता

पंतप्रधान स्वास्थ्य सेवा योजनेखाली नोंद झालेल्या राज्यातील ११ खासगी रुग्णालयांना लसीकरणास मान्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात सोमवारपासून ३७ सरकारी केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लसीकरण सुरू झाले असून मंगळवारपासून १५ खासगी रुग्णालयांतूनही मोहीम सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य करोना प्रतिबंध लसीकरण व्यवस्थापनाचे अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. यामुळे मंगळवारपासून त्या १५ खासगी रुग्णालयांत जाऊन ज्येष्ठ नागरिक लस घेऊ शकणार आहेत.

या इस्पितळांना लसीकरणाची परवानगी

पंतप्रधान स्वास्थ्य सेवा योजनेखाली नोंद झालेल्या राज्यातील ११ खासगी रुग्णालयांना लसीकरणास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली नोंद झालेल्या ३ खासगी इस्पितळांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दोनापावला येथील मणिपाल, ‘हेल्थ वे’ची मळा-पणजी, पर्वरी आणि जुने गोवे येथील रुग्णालये, म्हापशातील व्हिजन, डिचोलीतील म्हार्दोळकर, फोंड्यातील सावईकर नर्सिंग होम, चिखलीतील साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर आणि मडगावातील अपोलो इस्पितळाचा समावेश आहे. त्याचबरोबर उसगावकर इस्पितळ (फोंडा), आशीर्वाद इस्पितळ (मालभाट मडगाव), डॉ. मडकयकार इस्पितळ, डॉ. कंटक इस्पितळ (मडगाव), मदर केअर इस्पितळ (मडगाव), माय आय (नुवे), विश्व संजीवनी (वास्को), पै इस्पितळ (वास्को), वात्सल्य (वास्को) याही इस्पितळांचा समावेश आहे. खासगी इस्पितळांमध्ये प्रत्येक डोससाठी २५० रुपये आकारले जाणार आहेत.

हेही वाचाः हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका, नव्याने अध्यादेश काढून निवडणुका घ्या

हेही वाचाः महत्त्वाची बातमी! कुणकेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा यंदा रद्द

हेही वाचाः MAAN KI BAAT | ‘मन की बात’मध्ये मोदींनी केली या विषयांवर चर्चा

हेही वाचाः सिलिंडर पुन्हा एकदा २५ रुपयांनी महागला, किंमत ८००च्या पार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!