Top 25 | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

बातम्यांचा झटपट आढावा एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी महापालिकेसाठी सत्तासंघर्षाची ठिणगी

पणजी महापालिकेसाठी भाजपमध्ये उभी फूट, सीसीपीच्या सिंहासनासाठी सत्तासंघर्षाची ठिणगी, बाबूश मोन्सेरातांआड भाजप निष्ठावंतांनी पुकारलं बंड.

टॅक्सीचालकांकडून 31 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम

खासगी टॅक्सीमालक संघटनेचा सरकारला इशारा, 31 मार्चपर्यंत गोवा माईल्सवर बंदी न घातल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, वाहतूक संचालकांच्या भेटीनंतर टॅक्सीचालकांना सरकारला अल्टिमेटम.

मोपात ‘मेळावली पॅटर्न’ची झलक

मोपा विमानतळ प्रकल्प पीडितांचं मेळावलीप्रमाणेच आंदोलन सुरू, सलग दुसर्‍या दिवशी ‘आमची जमीन आमका जाय’चा नारा, आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता.

घरगुती गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला

घरगुती गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला, नवे दर सोमवारपासून लागू, इंधनापाठोपाठ गॅसच्या किमतीही भडकल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.

राज्याचा बेरोजगारी दर 21 टक्क्यांवर

राज्याचा बेरोजगारी दर 21 टक्क्यांवर, बेकारीमध्ये गोवा फेब्रुवारीत तिसर्‍या क्रमांकावर, एचआरडीतील 750 नोकर्‍यांसाठी हजारो अर्ज

सत्तरीतील धबधबे पर्यटकांसाठी बंद

सत्तरीतील धबधबे पर्यटकांसाठी बंद, 1 मार्चपासून धबधब्यांवर बंदी, वन खात्याचा निर्णय, धबधब्यांवरील मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं खबरदारीचा निर्णय.

तरुण तेजपाल खटल्याची सुनावणी गुरुवारपासून

सोमवारपासून सरू होणारी तरुण तेजपाल खटल्याची सुनावणी गुरुवारपासून होणार सुरू, 4 मार्चपासून सुरू होणार्‍या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष.

कोरोनाबाबत राज्यात दिलासादायक स्थिती

कोरोनाबाबत राज्यात दिलासादायक स्थिती, मंगळवारी दिवसभरात आढळले 47 कोरोनाबाधित, 48 जण उपचाराअंती कोरोनामुक्त, दिवसभरात एकाही कोरोनाबळीची नोंद नाही.

महाराष्ट्र, कर्नाटकनं इंजिनियर नेमावे

म्हादईची पाहणी करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्र, कर्नाटकनं इंजिनियर नेमावे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं आवाहन, गोव्यानं आधीच इंजिनियरची केली नेमणूक, अहवालाअंती कोर्ट समाधानकारक निर्णय देणार असल्याचा व्यक्त केला आशावाद.

सीझेडएमपीबाबत सुनावणीसाठी हस्तक्षेपास नकार

किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्यावर तालुकानिहाय सुनावणी घेण्याची याचिका हायकोर्टाकडून निकाली, विषय हरित लवादाच्या कक्षेत येत असल्यानं हस्तक्षेप करण्यास दिला नकार.

कोरोना साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्याची 88 कोटींची खरेदी, चढ्या दराने साहित्य खरेदीमुळे 35 कोटी रुपयांचा घोटाळा, भाजपकडून पत्रकार परिषदेत आरोप.

शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीवरून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं, मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील, असे फुगे हवेत का सोडत आहात, शिवसेनेनं मोदी सरकारला केला सवाल.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ग्रंथालये धोक्यात

कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रातील 12 हजार 149 सार्वजनिक ग्रंथालये धोक्यात, 21 हजार 615 कर्मचार्‍यांची अवस्था बिकट, वर्षातून दोनदा मिळणारं अनुदान चार टप्प्यांत मिळत असल्यानं बहुसंख्य ग्रंथालय पडली बंद, अनेक कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ.

भारतीय किसान युनियनने थोपटले दंड

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या भारतीय किसान युनियनने थोपटले केंद्र सरकारविरोधात दंड, विविध राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवण्यासाठी कसली कंबर, पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराविरोधात प्रचारासाठी पाठवणार पथकं, बलबीरसिंह राजेवाल यांची घोषणा.

युवक काँग्रेसची पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर निदर्शने

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची दिल्लीतील पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर निदर्शनं, आक्र्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

प्रियंका गांधींची ‘चाय की बात’

प्रियंका गांधींची ‘चाय की बात’, थेट मळ्यात जाऊन केली चहाच्या पानांची तोडणी, चहाच्या मळ्यामध्ये इतर महिला कामगारांसोबत केलं काम.

लोकसभा-राज्यसभा टीव्ही चॅनेलचं विलिनीकरण

लोकसभा-राज्यसभा टीव्ही चॅनेलचं सरकारकडून विलिनीकरण, आता संसद टीव्हीचे सीईओ म्हणून रवी कपूर यांची नियुक्ती.

शार्दुल ठाकुरची तुफान फटकेबाजी

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात शार्दुल ठाकूर चमकला, तुफान फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला, अवघ्या 57 बॉल्समध्ये कुटल्या 92 धावा, थोडक्यात शार्दुलचं शतक हुकलं.

विनेश फोगाटची सुवर्ण कामगिरी

कुस्तीपटू विनेश फोगाटचं दणक्यात पुनरागमन, कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटची सुवर्ण कामगिरी.

विराट कोहलीचा मैदानाबाहेर विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स, जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर पहिल्या तीन क्रमांकावर.

सिंधू-सायनामध्ये उपांत्य सामना रंगणार?

जागतिक अजिंक्यपद विजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी, वैयक्तिक सामने जिंकल्यास महिला एकेरीचा उपांत्य सामना सिंधू आणि सायनामध्ये रंगण्याची शक्यता.

विजयानंतरही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर

यश नाहर आणि अंकित बावणेच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राचा विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पुदुचेरीवर 137 धावांनी विजय, मात्र तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावं लागल्यानं बाद फेरीत मजल मारण्याचं स्वप्न अधुरं.

अभिनेता आरोह वेलणकर झाला बाबा

मराठी बिग बॉस फेम अभिनेता आरोह वेलणकरने शेअर केली आनंदाची बातमी, आरोहच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत पत्नीनं मुलाला जन्म दिल्याचं केलं जाहीर.

‘वंडर वूमन’ गल गॅडोत पुन्हा होणार आई

हॉलिवूडची अभिनेत्री गल गॅडोत तिसर्‍यांदा होणार आई, सोशल मीडियावरून फोट पोस्ट करत दिली माहिती, ‘वंडर वूमन 1984’ चित्रपटामुळे गल पोचली जगभरात.

अज्ञातानं अडवली अजय देवगणची गाडी

अभिनेता अजय देवगण मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना अज्ञातानं अडवली गाडी, शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त न केल्यामुळे जाब विचारण्याचा केला प्रयत्न, पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!