5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला दणका

पाच नगरपालिकांच्या निवडणूक आरक्षणाची अधिसूचना अखेर रद्द, हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, 10 दिवसांत नवी अधिसूचना काढून नव्याने निवडणूक जाहीर करण्याचे आदेश, मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपेत नवे आरक्षण.

हायकोर्टाच्या निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान

पाच नगरपालिकांच्या आरक्षणाची अधिसूचना रद्द करण्याचा हायकोर्टाचा निवाडा राज्य सरकारला अमान्य, निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान.

राज्य सरकारवर विरोधकांची सडकून टीका

नगरपालिकांच्या आरक्षणातील घोळावरून हायकोर्टानं झापल्यानंतर विरोधकांची राज्य सरकारवर टीका, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे संकल्प आमोणकरांनी साधला निशाणा.

नमाज पठणासाठी जायचं कुठे?

पणजी महापालिकेनं घेतला सांतिनेजच्या मुस्लिमांशी पंगा, नमाजाची पर्यायी शेड मोडल्यानं मुस्लिम बांधवांची गैरसोय, महापौरांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं नाराजी.

म्हादई आटली, कर्नाटकनं गळा घोटला

इतिहासात पहिल्यांदा आटली म्हादई नदी, कर्नाटकनं म्हादई संपवल्याचा राजेंद्र केरकरांचा आरोप, पाण्यासाठी गोव्याची कोंडी करण्याचा कर्नाटकचा कट.

मोपा विमानतळाविरोधात स्थानिक आक्रमक

मोपा विमानतळाविरोधात स्थानिकांची निदर्शनं, घोषणाबाजी करत स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध, तुळसकरवाडी आणि नागझरमधील स्थानिक आक्रमक.

पायलटांसाठीची पेन्शन योजना पूर्ववत करा

आधी लॉकडाऊन आणि आता इंधन दरवाढीमुळे राज्यातील मोटारसायकल पायलट अडचणीत, पायलटांसाठीची पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याची राज्य सरकारला विनंती.

कोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात

देशभर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांनी घेतली लस, राज्यातही ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण.

आसगावात साईबाबा घुमटीची मोडतोड

सोनारखेड आसगावात अज्ञाताकडून साईबाबा घुमटीची मोडतोड, हणजूण पोलिसांनी केला पंचनामा.

गोव्याच्या किनार्‍यावर गायत्री दातारची धमाल

गोव्याच्या किनार्‍यावर गायत्री दातारची धमाल, व्हेकेशननिमित्त गायत्री आली गोव्यात, किनार्‍यावर धमाल करतानाचे फोटो व्हायरल.

महाराष्ट्रात 6 हजार 397 नवे करोनाबाधित

महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 397 नवे करोनाबाधित, 5 हजार 754 रुग्ण करोनामुक्त, दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू.

देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुंपली

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठिणगी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अजित पवारांमध्ये जुंपली, विदर्भ-मराठवाड्यासाठी भीक मागत नसल्याची फडणविसांची टीका.

पाच कोटी दिल्याचा पूजाच्या आजीचा आरोप

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटींची रक्कम दिली, पूजाची चुलत आजी शांता राठोडांचा आरोप, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन वादंग कायम.

महाराष्ट्र पोलिसांना वाळूशिल्पातून मुजरा

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यकथा सांगणारी ‘नवे लक्ष्य’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जुहू चौपाटीवर भव्यदिव्य वाळूशिल्प साकारून स्टार प्रवाह वाहिनीचा महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा, तीन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर साकारलं वाळूशिल्प.

मुंबईतील बत्तीगुल होण्यामागे चीनचा हात?

मुंबईतील वीज खंडित होण्यामागे चीनचा हात, अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा अहवालाच्या आधारे दावा, मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडित.

व्हिव्हियन रिचर्डस इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले

खेळपट्टीवरुन रडगाणं बंद करा आणि खेळ सुधारा, वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्डस इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले, मोटेरावरील मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंडनं दिला होता खेळपट्टीला दोष.

मुंबईतील आयपीएल सामने प्रेक्षकांविना?

आयपीएल स्पर्धेतील सामने चार शहरांत खेळविण्यावर शिक्कामोर्तब, मात्र मुंबईतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्याचा निर्णय शक्य, बीसीसीआयकडून सर्व शक्यतांची पडताळणी.

राहुल गांधी तामिळनाडू दौर्‍यावर

राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौर्‍यावर, विद्यार्थ्यांसोबत स्टेजवर मारले पुशअप्स, मंचावर विद्यार्थ्यांसोबत घेतला थिरकण्याचा आनंद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.

जीएसटीमधून केंद्र सरकारची घसघशीत कमाई

जीएसटीमधून केंद्र सरकारची घसघशीत कमाई, सलग तिसर्‍या महिन्यात एक ट्रिलियन रुपये जमा, फेब्रुवारीमध्ये जमा झाला 1.13 ट्रिलियन रुपये जीएसटी महसूल.

नवीन राजकीय पक्ष स्थापण्यास ट्रंपचा नकार

व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पहिल्यांदा दिसले डोनाल्ड ट्रंप, नवीन राजकीय पक्ष स्थापण्यास दिला नकार, जो बायडन यांच्यावर साधला निशाणा.

नासाच्या यानाचं भारतीयाकडून नियंत्रण

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या मंगळ मोहिमेतील पर्सिव्हिअरन्स रोव्हरचं नियंत्रण भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाच्या हातात, संजीव गुप्ता पाहतात पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रणाचं काम.

पाकिस्तानकडून 17 भारतीय मच्छीमारांना अटक

पाकिस्तानच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपातून 17 भारतीय मच्छिमारांना अटक, तीन बोटीही जप्त, पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिली भारतीय यंत्रणेला माहिती.

चॅडवीक बोसमन यांना मरणोत्तर ‘गोल्डन ग्लोब’

‘ब्लॅक पँथर’ फेम सुपरस्टार चॅडवीक बोसमन मरणोत्तर ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारानं सन्मानित, 2020मध्ये आलेला ‘मा रेनीज ब्लॅक बॉटम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरव, वर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या सोहळ्यात बोसमन यांची पत्नी सिमोन लेडवर्ड यांनी स्वीकारला पुरस्कार.

‘जहा चार यार’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘जहा चार यार’ हा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री स्वरा भास्कर, शिखा तलसानिया, मेहेर विज आणि पूजा चोप्रा यांची प्रमुख भूमिका, चार मैत्रिणी गोव्याला गेल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडतं, हे सांगणारी थरारक कथा.

करिश्मा कपूरचा फिटनेस चर्चेत

बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री करिश्मा कपूरचा फिटनेस चर्चेत, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत दिसून आला तरुणींना लाजवणारा फिटनेस, फोटो व्हायरल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!