5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

शनिवारी चार कोविडबाधितांचा मृत्यू

कोरोनामुळे राज्यात शनिवारी चार जणांचा मृत्यू, पणजीतील 68 वर्षीय महिला, तर मुरगावातील 56 वर्षीय पुरुषासह नेरुलमधील 75 वर्षीय आणि करंझाळेतील 47 वर्षीय पुरुषाचा गोमेकॉत मृत्यू, राज्यातील एकूण मृतांचा आकडा 872.

ऑक्सीजनच्या निर्यातीस सरकारकडून बंदी

कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ, ऑक्सिजन सिलिंडर राज्याबाहेर निर्यात करण्यास बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय, औद्योगिक ऑक्सीजन कोविड इस्पितळं, गोमेकॉ आणि आरोग्य सेवा विभागासाठी वळवणार.

गोव्यात येणार्‍यांना आरटीपीसीआर अनिवार्य करा!

कोरोना प्रसार रोखण्यासाठी परराज्यांतून गोव्यात येणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करा, विद्यार्थ्यांची मागणी असेल, तर बारावीची बोर्ड परीक्षा पुढे ढकला, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचं सरकारला आवाहन.

रमाकांत वेर्लेकर यांचा कोरोनाने मृत्यू

रमाकांत वेर्लेकर यांचा कोविडमुळे मृत्यू, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे ओएसडी म्हणून अने वर्षं पाहिलं काम.

मडगाव पाठोपाठ म्हापशातही विद्यार्थ्यांची निदर्शनं

मडगाव पाठोपाठ म्हापशातही विद्यार्थ्यांची निदर्शनं, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी, परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विद्यार्थ्यांचा सल्ला.

दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच!

दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच, गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांची स्पष्टोक्ती, सर्व काळजी घेऊन पार पडणार परीक्षा, थर्मल स्कॅनिंगसह परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणार, एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांची घेणार परीक्षा, पॉझिटिव्ह आढळल्यास आयसोलेशनची करणार व्यवस्था.

मिलाग्रीस फेस्ताची सार्वजनिक प्रार्थना रद्द

म्हापशाच्या मिलाग्रीस फेस्तानिमित्त होणारी सार्वजनिक प्रार्थना कोविडमुळे रद्द, सेंट जेरॉम चर्चचे फादर दिनीज फर्नांडिस यांनी दिली माहिती, 19 एप्रिलला अवर लेडी ऑफ मिलाग्रीसचे फेस्त, मास युट्यूबवर होणार टेलिकास्ट.

परीक्षा रद्द करण्याबाबत खंवटेंचं मोदींना पत्र

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, आमदार रोहन खंवटे यांची मागणी, हस्तक्षेप करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं पत्र.

साडेपाच लाखांचा चरस पर्वरीत जप्त

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई, शुक्रवारी मध्यरात्री पर्वरीत छापा टाकून साडेपाच लाखाचा 1 किलो 100 ग्रॅम चरस केला जप्त, उत्तर प्रदेशचा आलम शाह याला अटक.

भाजपच्या बाजूने जाण्यासाठी कोट्यवधींची ऑफर

साखळी नगरपालिकेत भाजपच्या बाजूने जाण्यासाठी कोट्यवधींची ऑफर, बंगला आणि फ्लॅट्सचीही लालुच, साखळीचे माजी सरपंच प्रविण ब्लेगन यांचा आरोप, भाजपनं राजकारणाची पातळी घालवल्याची टीका.

ओशियन वेलनेस हॉटेल पेड कोविड सेंटर

सांगोल्डातील ओशियन वेलनेस हॉटेलला पेड कोविड सेंटर म्हणून मान्यता, प्रतिदिन अडिच हजार रुपये शुल्क, आयएमए पुरविणार अडीच हजारात मेडिकल किट, मोफत टेलीकन्सल्टेशनचाही मिळणार लाभ.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक, दिवसभरात 67 हजार 123 करोनाबाधितांची नोंद, 419 रुग्णांचा मृत्यू, 6 लाख 47 हजार 933 सक्रिय रुग्ण.

मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावा!

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रमाणपत्राप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावा, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा टोला.

नाशिकमध्ये धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 5 मुलींचा समावेश, पाण्यात उभं राहून फोटो काढण्याचा प्रयत्न बेतला जिवावर.

कुंभमेळा आटोपता घेतल्याची घोषणा

जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांनी कुंभमेळा आटोपता घेत असल्याची केली घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय, कुंभमेळ्यासाठी पुजेला लावलेल्या देवतांचं विसर्जन.

गैरभाजपा शासित राज्यांवर केंद्राचा अन्याय!

गैरभाजपा शासित राज्यांवर केंद्राचा अन्याय, सोनिया गांधींची केंद्र सरकारवर घणाघाती टीका, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सोनिया गाधींचा भाजपावर निशाणा.

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन, 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, 10 लाखांचा ठोठावला दंड, मंजुरीविना देशबाहेर न जाण्याची अट.

ट्विटरची सेवा ठप्प झाल्यानं गोंधळ

ट्विटरची सेवा अचानक ठप्प झाल्यानं गोंधळ, 40 हजारहून अधिक युजर्सनी केली तक्रार, कंपनीकडून सेवा सुरळीत केल्याचं टि्वट.

एचडी कुमारस्वामी यांना कोरोनाची लागण

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना कोरोनाची लागण, कर्नाटकमध्ये कोरोनाचा झपाट्यानं फैलाव, मुख्यमंत्री येडियुराप्पांना झाला दुसर्‍यांदा संसर्ग.

देशभर कोरोनाचं थैमान, मृत्यू वाढले

कोरोनानं देशभरात 24 तासांत घेतले 1 हजार 341 बळी, 2 लाख 34 हजार 692 नव्या बाधितांची नोंद, कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, मृतांचे वाढणारे आकडे चिंताजनक.

सॅम्सचं आरसीबीच्या ताफ्यात पुनरागमन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा डावखुरा गोलंदाज डॅनियल सॅम्स संघात सामील, आयपीएल सुरू होण्याआधी झाला होता कोरोना पॉझिटिव्ह.

ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी संघ येणार भारतात

ऑक्टोबरमध्ये भारतात होणार्‍या टी-20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मिळणार व्हिसा, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माहिती, बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या बैठकीत निर्णय.

दीपक चहरनं जिंकली चाहत्यांची मनं

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स सामन्यापूर्वी पाहायला मिळालं गुरुशिष्याचं नातं, चेन्नईच्या वेगवान गोलंदाज दीपक चहरनं मोहम्मद शमीला केलेला नमस्कार चर्चेत, फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिकेतील अभिनेत्रीचं निधन

‘हॅरी पॉटर’ चित्रपटांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन यांचं निधन, वयाच्या 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, काही दिवसांपासून देत होत्या कॅन्सरशी झुंज.

‘तान्हाजी…’ सिनेमा मराठीतून पाहण्याची संधी

अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमा मराठीतून पाहण्याची संधी, स्टार प्रवाह वाहिनीवर 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता सिनेमा होणार प्रदर्शित.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!