5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट
राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 868.
कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ
कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, दिवसभरात तब्बल 927 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पार.
सर्वांना मिळणार लस : मायकल लोबो
45 वर्षांखालील नागरिकांनाही मिळणार कोरोना प्रतिबंधक लस, मंत्री मायकल लोबो यांची माहिती, कोरोनाच्या दुसर्या लाटेचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसल्याची कबुली.
राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत
राज्यातील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचं सूचक विधान, लॉकडाऊन करणं शक्य नाही, परंतु सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचा विचार.
मुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यात धक्का
साखळी नगरपालिकेत भाजप पॅनलचा पराभव, नगराध्यक्ष माडकरांविरोधातला अविश्वास ठराव 7 विरुद्ध शून्य मतांनी संमत, धर्मेश सगलानी गटाचा पालिकेवर झेंडा.
कुडचडे नगरपालिकेवर भाजपचा झेंडा
कुडचडेत भाजपची राजकीय चाल यशस्वी, बाळकृष्ण होडारकरांविरुद्ध अविश्वास ठराव 9 विरुद्ध 6 मतांनी संमत, भाजप पॅनलचे विश्वास सावंत देसाई नगराध्यक्षपदी.
यंदा 98 टक्के पावसाची शक्यता
जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज, यंदा 98 टक्के पावसाची शक्यता, हवामान खात्याने जारी केला यंदाचा मोसमी हवामान अंदाज.
बार्देस, पेडणे तालुक्यात रविवारी बत्ती गुल
थिवी सबस्टेशनवर महत्त्वाचं दुरुस्तीकाम, रविवारी 18 एप्रिलला बार्देस आणि पेडणे तालुक्यात शट डाऊन, सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीज खंडित.
परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा पुढे ढकला!
दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, मडगावात विद्यार्थ्यांची निदर्शनं, परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा पुढे ढकला, गोवा बोर्डाला विद्यार्थ्यांचा सल्ला.
राज्यात पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त
ग्रामीण भागांसह शहरातही पाण्यासाठी नागरिकांची वणवण, पेडणे-सत्तरी-फोंड्यासह पर्वरीतही नागरिक त्रस्त, सरकारच्या हर घर जल घोषणेचा फज्जा.
महाराष्ट्र सरकारच्या मदतीला धावले अंबानी
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्राला पुरवणार ऑक्सिजन, गुजरातमधील जामनगरमधून होणार नि:शुल्क पुरवठा.
हाफकिनला कोवॅक्सीन लसनिर्मितीची परवानगी
मुंबईतल्या हाफकिन संस्था करणार कोवॅक्सीन लसीशी निर्मिती, केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मान्यता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता पाठपुरावा.
कुंभमेळ्यातून परतणार्या भाविकांचा शोध
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातून परतणार्या भाविकांचा शोध घेण्यास सुरुवात, महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत मोहीम.
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, इंग्लंडच्या गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील, सीबीआयनं दिली माहिती.
प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याची केली विनंती.
उत्तर प्रदेशात कठोर विकेंड लॉकडाउन
उत्तर प्रदेशात विकेंड लॉकडाउन, विनामास्क आढळल्यास 10 हजार रुपये दंड, योगी सरकारचा निर्णय, रविवारी असणार लॉकडाउन.
राम मंदिरासाठीचे 15 हजार चेक बाऊन्स
राम मंदिरासाठीच्या देणग्यांचे 15 हजार चेक झाले बाऊन्स, 2 हजार चेक अयोध्येतले, अयोध्येतील राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात मिळाली होती चेकद्वारे देणगी.
पुनावालांची ज्यो बायडेन यांना विनंती
सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांची अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना विनंती, कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करण्याबाबत केलं ट्विट.
येडियुरप्पांना दुसर्यांदा कोरोनाची लागण
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण, ताप आल्यानं रुग्णालयात दाखल.
राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
तुघलकी लॉकडाउन ते प्रभूगान ही मोदी सरकारची रणनीती, राहुल गांधी यांची टीका, देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधला निशाणा.
पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी, मुख्य निवडणूक अधिकारी आरिझ आफताब यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.
तेलंगणमध्ये बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
तेलंगण सरकारनं दहावीच्या परीक्षा केल्या रद्द, बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे, मुख्य सचिव चित्रा रामचंद्रन यांनी केली घोषणा.
रणजीत सिन्हा यांचं निधन
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन, 68व्या वर्षी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, आयटीबीपीचे महासंचालक म्हणूनही केलं उल्लेखनीय काम.
स्मारके, पर्यटन स्थळे, संग्रहालये पर्यटकांसाठी बंद
भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी सर्व स्मारके, पर्यटन स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी बंद, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांची माहिती.
बीसीसीआयने जाहीर केले वार्षिक करार
विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराहचा बीसीसीआयच्या महागड्या खेळाडूंत समावेश, बीसीसीआयनं जाहीर केले वार्षिक करार.