5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

राज्यात 24 तासांत पाच कोविड बळी

राज्यात कोरोनाचं थैमान, 24 तासांत पाच बळी, आठ दिवसांत 22 जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या 862.

राज्यात कारोनाचे 5682 सक्रिय रुग्ण

दिवसभरात 757 नव्या कोरोना रुग्णांची भर, 5682 सक्रिय रुग्ण, ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रकोप चिंताजनक.

फुटीर आमदारांचा ‘निकाल’ 20 एप्रिलला

काँग्रेस आणि मगोपच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी 20 एप्रिलला अंतिम निवाडा, सभापती राजेश पाटणेकर जाहीर करणार निकाल, तर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल 21 एप्रिलला.

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालान्त मंडळाचा दिलासा

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालान्त मंडळाचा दिलासादायक निर्णय, कोरोनाबाधित विद्यार्थ्यालाही परीक्षा देणं शक्य, परीक्षा हुकली तर जूनमध्ये मिळणार दुसरी संधी.

टॅक्सीवाल्यांकडून सरकारला अल्टिमेटम

टॅक्सीवाल्यांचं आझाद मैदानावरील आंदोलन आणखी तीव्र, बायका-मुलांचाही आंदोलनात सहभाग, गोवा माईल्सबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम.

ताळगावमध्ये एकावर चॉपरने हल्ला, दोघे अटकेत

नागाळी-ताळगावमध्ये विष्णू कुट्टीकर याच्यावर चॉपरने हल्ला, पणजी पोलिसांकडून दिपेश काणकोणकर आणि परी पंडित यांना अटक.

रेडेघाटी-वाळपईतील अपघातात एकाचा मृत्यू

रेडेघाटी-वाळपईत तीन वाहनांचा अपघात, सिलिंडरवाहू टेम्पो उलटला, दुचाकीस्वार दत्तप्रसाद गांवकर याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू, एक किरकोळ जखमी.

इंग्रजी शाळांचं सरकारी अनुदान बंद करा!

इंग्रजी शाळांना चालू असलेलं सरकारी अनुदान बंद करा, भाषा सुरक्षा मंचाचा काणकोणमध्ये एल्गार, सुभाष वेलिंगकरांनी फुंकलं सरकारविरोधात रणशिंग.

साखळीत नगरपालिका राजकारणाला रंगत

नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावर शुक्रवारी बैठक, सगलानी गटातील नगरसेवकाविरोधात अपात्रता याचिका, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता नगरविकासमंत्र्यांसमोर सुनावणी, दुपारी अडिच वाजता अविश्वास ठरावावर चर्चा, अविश्वास ठराव टाळण्यासाठी अपात्रतेची खेळी.

प्रदेश काँग्रेसचा संवाद-माध्यम विभाग बरखास्त

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा संवाद आणि माध्यम विभाग बरखास्त, अखिल भारतीय काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर यांना आदेश.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हाताबाहेर

महाराष्ट्रात दिवसभरात वाढले 61 हजार 695 कोरोनाबाधित, 349 रुग्णांचा मृत्यू, 6 लाख 20 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण.

कुंभमेळ्यानं फोडला कोरोनाचा अणुबॉम्ब!

हरिद्वारच्या कुंभमेळ्यानं फोडला कोरोनाचा अणुबॉम्ब, शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणार्‍यांना कोरोनाची बाधा, शिवसेनेची ‘सामना’च्या संपादकीयमधून टीका.

महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

कुंभमेळ्यात सहभागी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन, हरिद्वार कुंभमेळ्यात झालं होतं कोरोना नियमांचं उल्लंघन.

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

ऑक्सिजन नाहीच, कोरानावरील लसदेखील नाही, केंद्र सरकारकडून उत्सवाचं ढोंग, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा.

दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा, जतनेशी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद.

कोरोना रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

देशात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 2 लाखांच्या पुढे, सलग दुसर्‍या दिवशी 1 हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू, देशात कोरोना रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक.

‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत

रशियाच्या कोरोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सज्ज, एप्रिलअखेरीस लशीच्या आयातीची प्रक्रिया होणार सुरू, लस उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारवर अवलंबून.

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री रोडावली

वाहन विक्रीत वार्षिक 13.6 टक्क्यांची घसरण, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री 2.24 टक्क्यांनी रोडावली.

अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून नऊ तास चौकशी, माजी पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत झाडाझडती.

‘अन्नियन’ चित्रपटाच्या घोषणेआधीच वाद

आगामी चित्रपटाविषयीच्या वादामुळे दिग्दर्शक शंकर अडचणीत, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दिसणार प्रमुख भूमिकेत, मात्र ‘अन्नियन’ चित्रपटाच्या घोषणेआधीच कॉपीराईट हक्कांवरून वाद.

कमाल खानला हायकोर्टाकडून कानपिचक्या

अभिनेता कमाल खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून कानपिचक्या, खालच्या दर्जाची टीका केल्यावरून निर्माता वाशू भगनानींनी केला होता मानहानीचा दावा.

‘रामायण’ मालिकेचं पुन:प्रसारण

‘रामायण’ मालिकेचं पुन:प्रसारण, स्टार भारत वाहिनीवर दररोज संध्याकाळी 7 वाजता मालिका होणार प्रसारित, गतवर्षी लॉकडाऊनमध्ये झाली होती पुन्हा प्रदर्शित.

‘दिल है दीवाना’ म्युझिक व्हिडीओचा टीझर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘दिल है दीवाना’ म्युझिक व्हिडीओ, सोशल मीडियावर टीझर व्हायरल, अर्जुन आणि रकुलचा लूक चर्चेत.

संजू सॅमसनच्या झेलचं सोशल मीडियावर कौतुक

राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनची पुन्हा कमाल, दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनचा घेतला अफलातून झेल, व्हिडीओ व्हायरल.

‘ती’ तरुणी कलानिधी मारन यांची मुलगी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर तरुणीचे फोटो चर्चेत, पराभवानंतर निराश झालेली तरुणी कलानिधी मारन यांची मुलगी, मारन यांच्या सन ग्रुपकडे सनरायजर्स हैदराबादची मालकी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!