5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

राज्यात महासाथीचं संकट गडद

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ, 540 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता, दिवसभरात एकाचा मृत्यू, 3 हजार 969 सक्रिय रुग्ण.

राज्यात ‘टीका उत्सव’ उत्साहात सुरू

देशभर कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम, राज्यातही ‘टीका उत्सवाला’ जोमाने सुरुवात, विविध भागात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला लोकांचा मोठा प्रतिसाद.

हरवळेतील धबधब्यात दोघे बुडाले

हरवळेतील धबधब्यात दोघे युवक बुडाले, डोहात उतरून आंघोळ करणं बेतलं जीवावर, गोलू कुमार, सत्यम कुमार यांचा बुडून मृत्यू.

सलग तिसर्‍या दिवशी टॅक्सी चालकांचा एल्गार

सलग तिसर्‍या दिवशीही टॅक्सी चालकांचा एल्गार, आंदोलनात विरोधी पक्षांची उडी, गोवा माईल्स स्क्रॅप करण्याची आग्रही मागणी.

डिसा यांच्या नावानं फेसबुकवर बनावट अकाऊंट

नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या नावानं फेसबुकवर बनावट अकाऊंट, परिचितांकडे पैशांची केली मागणी, डिसा यांच्याकडून क्राइम ब्रँच आणि सायबर क्राइम विभागाकडे तक्रार.

पाच पालिकांच्या निवडणूक रिंगणात 402 उमेदवार

म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांच्या निवडणूक रिंगणात राहिले 402 उमेदवार, 49 जणांकडून अर्ज मागे.

पंचायत पोटनिवडणुकीतून दोघांची माघार

वेळ्ळी पंचायत पोटनिवडणुकीतून दोघांची माघार, वेळ्ळीतून दोन, तर कारापूर-सर्वण पंचायत पोटनिवडणूक लढवणार पाच उमेदवार.

जिवबा दळवी यांना कोरोनाचा संसर्ग

पेडणेचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना कोरोनाचा संसर्ग, पेडणे पोलीस आणि वाहतूक पोलीस स्थानकाच्या काही कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण, पेडणे पोलिस स्थानकाचा ताबा गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश कुमार यांच्याकडे.

फरार कैदी रामचंद्रम येलाप्पा अटकेत

कोलवाळ कारागृहातून पसार झालेला कैदी रामचंद्रम येलाप्पा अटकेत, म्हापसा पोलीस आणि गुन्हा शाखेची बंगळूरूत कारवाई, 23 सप्टेंबरला रामचंद्रम झाला होता पसार.

मोबाईल पळवणार्‍या तिघांना अटक

मोबाईल पळवणार्‍या तिघा संशयितांना अटक, वेर्णा पोलिसांची कारवाई, अक्षय तलवार, अस्लम मोमिन, सर्वेश बहादूर अटकेत, 40 हजारांचे मोबाईल हस्तगत.

वाहतूक बेटाला स्कुटर धडकली, युवक ठार

दाबोळीतील नौदलाच्या एनएसडीसमोरच्या वाहतूक बेटाला स्कुटर धडकून प्रकाश कुमार जागीच ठार, बबलू सुमन गंभीर जखमी, उपचारांसाठी बांबोळीच्या जीएमसीत दाखल.

महाराष्ट्रात आठ दिवस लॉकडाऊन?

महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती चिंताजनक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली सर्वपक्षीय बैठक, लॉकडाउनबाबत निर्णय घेण्याचे संकेत.

युवक काँग्रेसची सोशल मीडिया चॅम्पियन टीम

भाजपच्या आयटी सेलशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सज्ज, युवक काँग्रेसची सोशल मीडिया चॅम्पियन टीम तयार करण्याचा निर्णय, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची माहिती.

अन्यथा सीरम इन्स्टिट्यूटची वाहनं रोखणार!

एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करा, अन्यथा सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहनं अडवणार, राजू शेट्टी यांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना इशारा.

काँग्रेस आमदाराचं कोरोनानं निधन

काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनानं निधन, कोरोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईत सुरू होते उपचार.

कोरोनामुक्तीसाठी मंत्र्यांकडून पूजा

मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अजब करामत, कोरोनापासून लवकर मुक्ती मिळावी, यासाठी विमानतळावरच सुरू केली पूजा, चेहर्‍यावर मास्क न घालता पूजा केल्यानं टीका.

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, 5 जणांचा मृत्यू, 44 जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार.

अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी!

अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयानक दुसरी लाट आल्याचा आरोप.

देशात 24 तासांत आढळले 1,45,384 रुग्ण

देशात 24 तासांत आढळले 1 लाख 45 हजार 384 रुग्ण, 800 रुग्णांचा मृत्यू, देशात 24 तासांत रुग्णसंख्येचा नवा उच्चांक.

काश्मीरमधील चकमकींत सात दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराची धडक कारवाई, वेगवेगळ्याचकमकींत सात दहशतवादी ठार, अन्सार गझतुल हिंदचा प्रमुख इम्तियाझ अहमद शहा याचा मृतांत समावेश.

मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव

आयपीएलच्या चौदाव्या पर्वाची सुरुवात रोमहर्षक, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरूतील सामन्यात बंगळुरूची मुंबईवर 2 गड्यांनी सरशी.

एकशिंगी गेंड्यासाठी रोहित शर्माचा पुढाकार

एकशिंगी गेंड्यासाठी रोहित शर्मानं घेतला पुढाकार, एकशिंगी गेंड्याची प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर, बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एकशिंगी गेंड्याचा फोटो, गेंड्यांना वाचवण्याचा दिला संदेश.

क्रिकेटमधील सर्वांत स्लो चेंडूची नोंद

क्रिकेटमधील सर्वांत स्लो चेंडूची नोंद, न्यूझीलंडची महिला गोलंदाज लेह कास्पार्कने 38 किलोमीटर प्रति तास वेगानं फेकला चेंडू, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात कास्पार्कची कामगिरी.

एकता कपूरवर पोस्टरचोरीचा आरोप

अल्ट बालाजी निर्मित ‘हिज स्टोरी’ वेब सीरिजचं पोस्टर वादात, निर्माती एकता कपूरवर पोस्टरची थिम चोरल्याचा आरोप, 2015 साली आलेल्या ‘लव्ह’ सिनेमाचं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप.

अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनानं निधन

‘महाभारत’ मालिकेत इंद्राची भूमिका साकारलेले अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनानं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कौल यांनी 300 हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये केलं काम.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!