5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात तिघांचा बळी, एका अमेरिकन नागरिकाचा समावेश, तर 428 नव्या कोविडबाधितांची नोंद.

11 एप्रिलपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण

राज्यात 11 एप्रिलपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम, 14 एप्रिलपर्यंत चालणार मेगा लसीकरण, आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी जाहीर केला कार्यक्रम, पहिल्या टप्प्यात 20 पंचायतींमध्ये होणार लसीकरण.

पाच पालिकांसाठी 451 उमेदवार रिंगणात

दुसर्‍या टप्प्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया संपन्न, एकूण 451 उमेदवार पात्र, तीन उमेदवारांचे अर्ज ठरले बाद, 23 एप्रिलला मतदान, तर 26 एप्रिलला मतमोजणी.

टॅक्सीवाल्यांची मनमानी खपवून घेणार नाही!

राज्यात ‘एस्मा’ लागू, टॅक्सीवाल्यांची मनमानी खपवून घेणार नाही, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंचा इशारा, आडमुठी भूमिका सोडून टॅक्सीवाल्यांनी चर्चेला यावं, वाहतूकमंत्र्यांचं आवाहन.

खुनी हल्लाप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

गुंड अन्वर शेख खुनी हल्लाप्रकरणी व्हॅली डिकॉस्टा आणि अमीर गवंडीला पोलिस कोठडी, फातोर्डा पोलिसांसमोर पत्करली होती शरणागती.

हरमलमधील आग कोणी लावली?

गिरकरवाडा-हरमलमध्ये आगीचं तांडव, मांगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं डिसोझा दांपत्याचं 3 लाखांचं नुकसान, अज्ञातांनी आग लावल्याचा संशय.

काही ठिकाणी मिनी कंटेनमेंट झोन?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं काही ठिकाणी मिनी कंटेनमेंट झोन करणं शक्य, मात्र नाईट कर्फ्यू नाही, पर्यटनावर होऊ शकतो नाईट कर्फ्यूचा गंभीर परिणाम, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं मत.

पोलीस कॉन्स्टेबल सेवेतून निलंबित

होमगार्डना मारहाण आणि शिवीगाळ करणारा पोलीस कॉन्स्टेबल सेवेतून निलंबित, पोलीस बराकमधील व्हायरल व्हिडिओची दखल.

14 खोल्यांचं गेस्ट हाऊस जमीनदोस्त

सावतावाडो-कळंगुट इथल्या 14 खोल्यांचं गेस्ट हाऊस जमीनदोस्त, समुद्रकिनार्‍यावर बेकायदा उभारलेल्या बांधकामावर सीझेडएमएकडून कारवाई.

शनिवारपासून मिळणार राज्याबाहेरील मासळी

एसजीपीडीए अध्यक्षांनी ठेकेदार आणि घाऊक मच्छीविक्रेता असोसिएशनमध्ये घडवून आणला समेट, शनिवारपासून राज्याबाहेरील मासळी आणणार मार्केटमध्ये, संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम यांची माहिती.

सांगे, केपे, सासष्टी, मुरगावला पाणी नाही!

साळावली जलप्रक्रिया प्रकल्पातून 11 आणि 12 एप्रिलला सांगे, केपे, सासष्टी आणि मुरगाव तालुक्यात पाणीपुरवठा राहणार बंद, शेल्डे वीज उपकेंद्रावरील 11 एप्रिलला होणार्‍या दुरुस्तीच्या कामामुळे वीजपुरवठा बंद राहणार असल्यानं निर्णय.

अविश्वास ठरावावर 16 एप्रिलला बैठक घ्या!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी 16 एप्रिलला बैठक घ्या, उच्च न्यायालयाचे पालिका प्रशासनाला निर्देश, धर्मेश सगलानी आणि अन्य पाच नगरसेवकांनी दाखल केली होती याचिका.

गव्याचा कालव्यात बुडून मृत्यू

पेडण्यात गव्याचा कालव्यात बुडून मृत्यू, हाळी-चांदेल इथली घटना, तिळारी धरणाच्या कालव्यात बुडून गव्याचा दुर्दैवी अंत.

मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमनपदी सखा मळीक

गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमनपदी सखा मळीक यांची नेमणूक, तर उपाध्यक्षपदी प्रेमानंद चावडीकर यांची नियुक्ती.

नीलेश राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, गोवा आणि सिंधुदुर्गशी निगडित विषयांवर केली सविस्तर चर्चा.

सचिन वाझेंची आणखी होती योजना!

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठं करण्याची होती योजना, एनआयएचा दावा, तपासातून मोठा खुलासा होण्याची शक्यता.

उद्योगांसाठी ऑक्सीजन निर्मिती बंद

महाराष्ट्रात उद्योगांसाठी ऑक्सीजन निर्मिती बंद, कोरोना रुग्णांना पुरवठा वाढवण्यासाठी निर्णय, उद्योगधंद्यांसाठी ऑक्सिजनचं उत्पादन थांबवण्याचे आदेश देणार महाराष्ट्र सरकार.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय.

कोविड वॅक्सीनबाबत राजस्थानचीही तक्रार

कोविड वॅक्सीनबाबत राजस्थानचीही तक्रार, पंतप्रधानांकडे त्वरित पुरवठ्याची मागणी, दोन दिवसांत लसींचा साठा संपण्याची भीती.

‘कोब्रा’ कमांडोची नक्षलवाद्यांकडून सुटका

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या ‘कोब्रा’ कमांडोची सुटका, राकेश्वार सिंह मन्हास घरी परतल्यानं कुटुंबीयांनी मानले आभार.

मतदारांचं धर्माच्या आधारावर विभाजन नाही!

निवडणूक आयोगानं कितीही पिच्छा पुरवला, तरी मतदारांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्यास विरोधच करणार, ममता बॅनर्जींनी ठणकावलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत चढवला हल्ला.

गरिबांची संख्या वर्षभरात दुपटीहून अधिक

भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक, कोरोना महासाथीचा फटका, ग्रामीण भागावर मंदावणार्‍या अर्थव्यवस्थेचा विपरित परिणाम.

आरोपीच्या पत्नीला भाजपकडून निवडणुकीचं तिकीट

उन्नाव बलात्कार प्रकरणातलि आरोपीच्या पत्नीला भाजपकडून निवडणुकीचं तिकीट, आरोपी कुलदीप सेनगरची पत्नी लढणार निवडणूक.

लसींची निर्यात थांबवा : राहुल गांधी

लसींची निर्यात थांबवा, राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केंद्र सरकारनं पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी, राहुल यांची सूचना.

ब्रिटनचे प्रिन्स फिलीप कालवश

ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन, वयाच्या 99व्या वर्षी घेतला अंतिम श्वास, बकिंगहम पॅलेसकडून अधिकृत घोषणा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!