5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

राज्यात 582 नव्या रुग्णांची भर

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट, 582 नव्या रुग्णांची भर, दिवसभरात दोघांचा मृत्यू, 3 हजार 206 चाचण्यांचे अहवाल अद्याप येणं बाकी.

उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून निर्बंध

उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून निर्बंध लागू, उत्तर गोव्यातील सामाजिक, धार्मिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या मेळाव्यांवर मर्यादा.

सभागृहात 50 टक्के क्षमतेनं कार्यक्रम

उत्तर गोव्यातील सभागृहात 50 टक्के क्षमतेनं कार्यक्रम करण्यास अनुमती, जास्त क्षमता असलेल्या सभागृहात 100 लोकांनाच प्रवेश, जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांची सूचना.

खुल्या जागेत 200 लोकांची मर्यादा

उत्तर गोव्यात खुल्या जागेतील मेळाव्यासाठी 200 लोकांची मर्यादा, नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई, जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून मार्गदर्शक तत्वं जारी.

महत्वाच्या 84 खात्यांचं व्हीजन डॉक्युमेंट

अर्थसंकल्पाची वेळेत कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुढाकार, सर्व खात्याच्या सचिवांची बैठक घेऊन तयार केला कृती आराखडा, महत्वाच्या 84 खात्यांचं व्हीजन डॉक्युमेंट तयार.

वाहतूक कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर?

नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी एक वर्षं लांबणीवर पडण्याची शक्यता, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो लिहिणार केंद्र सरकारला पत्र, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनंतर नरमाईची भूमिका.

पाच नगरपालिकांसाठी 532 उमेदवार रिेंगणात

पाच नगरपालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात, अखेरच्या दिवसापर्यंत 532 उमेदवार रिेंगणात, 10 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत.

टॅक्सीचालकांचा बेमुदत बंद, पर्यटकांचे हाल

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेविरुद्ध टुरिस्ट टॅक्सीचालकांच्या बेमुदत बंदाला सुरुवात, पणजीच्या आझाद मैदानात एकत्र येत सरकारला दिलं आव्हान, मात्र गर्दीमुळे कोविड नियमांना बगल.

फ्रॅन्की कार्व्हालोंची उमेदवारी रद्द

म्हापशाचे विद्यमान नगरसेवक आणि भाजप उमेदवार फ्रॅन्की कार्व्हालोंची उमेदवारी रद्द, बोगस ओबीसी प्रमाणपत्र बार्देस उपजिल्हाधिकार्‍यांनी फेटाळलं.

जामीन, महत्त्वाच्या खटल्यांवरच सुनावणी

वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीनविषयक प्रकरणं आणि महत्त्वाचे खटलेच सुनावणीसाठी घेणार, इतर प्रकरणांसाठी देणार तारीख.

दोन्ही संशयित फातोर्डा पोलिसांना शरण

गुंड अन्वर शेख खुनी हल्ला प्रकरणातील फरार दोन्ही संशयित फातोर्डा पोलिसांना शरण, संशयित व्हॅली डिकॉस्टा आणि अमिर गवंडी याची पोलिसांसमोर शरणागती.

शिरोड्यातला व्यावसायिक दोषी

निकृष्ट दर्जाच्या फटाक्यांच्या विक्रीप्रकरणी शिरोड्यातला व्यावसायिक दोषी, मागच्या गणेश चतुर्थीदरम्यानची घटना, फोंडा प्रथम श्रेणी न्यायालयानं दोषी सिद्धार्थ नाईकला ठोठावला 10 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांची कैद.

राज्याला मिळणार 4 ते 5 हजार कोटी

केंद्रीय योजनांच्या माध्यमातून राज्याला मिळणार 4 ते 5 हजार कोटी रुपये, 70 टक्के प्रकल्प 19 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचे लक्ष्य, नाबार्डकडून घेणार 250 कोटींचं कर्ज.

म्हादईच्या विषयावर सखोल चर्चा

म्हादई बचाव आंदोलनाचे सदस्य, अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली बैठक, म्हादईच्या विषयावर केली सखोल चर्चा.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 56 हजार 286 करोनाबाधित, 376 रूग्णांचा मृत्यू, एकूण 5 लाख 21 हजार 317 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण.

ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.

काशी विश्वनाथ मंदिराचं सर्वेक्षण

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादात ट्विस्ट, न्यायालयानं पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी, वारणासीमधील दिवाणी न्यायालयानं दिला महत्वपूर्ण निर्णय.

केरळचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन कोरोना पॉझिटिव्ह, कोझिकोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल.

सीरम इन्स्टिट्यूटच्या अडचणींत वाढ

कोरोना प्रतिबंधक लसनिर्मिती करणार्‍या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या अडचणींत वाढ, कोरोना लसीसाठीचा कच्चा माल अमेरिका, युरोपनं थांबवला, अदर पूनावालांची माहिती.

जागतिक रुग्णसंख्येने ओलांडला 13 कोटींचा टप्पा

22 देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट, जागतिक रुग्णसंख्येने ओलांडला 13 कोटी 30 लाखांचा टप्पा, 28 लाख 86 हजार जणांचा मृत्यू.

भारतातून येणार्‍यांना न्यूझीलंडमध्ये नो एंट्री

भारतातून येणार्‍यांना न्यूझीलंडमध्ये नो एंट्री, स्वत:च्या नागरिकांनाही नाकारला प्रवेश, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी केली घोषणा.

ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताबाहेर?

ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अमिराती अथवा न्यूझीलंडमध्ये शक्य, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलार्डिस यांचा इशारा.

भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सुरुवात

भारतीय पुरुष हॉकी संघानं विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा केला 4-3 असा पराभव, अर्जेंटिना हॉकी दौर्‍यातील पहिल्या सराव सामन्यात आश्वासक सुरुवात.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा!

अभिनेत्री कंगना रणौतनं टि्वट करत ओढावून घेतला वाद, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी, दिग्दर्शक हंसल मेहतांच्या टि्वटवर दिला धक्कादायक रिप्लाय.

पोस्टरचा ‘रात्रीस खेळ चाले’…

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या प्रोमोशनसाठी झी मराठीनं वापरली नवी युक्ती, फक्त रात्रीच दिसणारं होर्डिंग लावून प्रेक्षकांचं वेधलं लक्ष.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!