5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड

काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, पेडणे, डिचोली आणि वाळपई पालिकेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर, चार ठिकाणी बिनविरोध, मात्र काणकोण-कुडचडेत निवडणूक.

कुंकळ्ळी नगराध्यक्षपदी लक्ष्मण नाईक

कुंकळ्ळीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलची निर्विवाद सत्ता, कुंकळ्ळी नगराध्यक्षपदी लक्ष्मण नाईक, उपनगराध्यक्षपदी अँथनी वाझ यांची वर्णी.

वाळपई नगराध्यक्षपदी सेहजीन शेख

वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सेहजीन शेख, उपनगराध्यक्षपदी अनिल काटकर, पालिकेत भाजप पुरस्कृत पॅनलची सत्ता.

पेडणेच्या नगराध्यक्षपदी उषा नागवेकर

पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षपदी उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष पदी मनोज हरमलकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांच्या पॅनलचं पालिकेत वर्चस्व.

डिचोली नगराध्यक्षपदी कुंदन फळारी

डिचोली नगराध्यक्षपदी कुंदन फळारी, तर उपनगराध्यक्षपदी तनुजा गावकर यांची निवड, भाजप पॅनलनं राखली सत्ता.

काणकोणात नगराध्यक्षपदाची निवड

काणकोण नगराध्यक्षपदाची माळ सायमन रिबेलो यांच्या गळ्यात, उपनगराध्यक्षपदी अमिता पागी, धीरज नाईक गावकर आणि सुप्रिया देसाई यांचा 7 विरुद्ध 5 मतांनी पराभव.

कुडचडेच्या नगराध्यक्षाविरोधात अविश्वास

कुडचडे-काकोडा पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्याविरुद्ध 9 नगरसेवकांकडून अविश्वास ठराव, विश्वास सावंत यांचा 8 विरुद्ध 7 मतांनी पराभव करून होडारकर झाले होते नगराध्यक्ष.

अपघातातील जखमीचं निधन

मेरशीतल्या पणजी-ओल्ड गोवा बायपासवर अपघातातील जखमीचं निधन, उपचार सुरू असताना हितेशकुमार चौधरीचा जीएमसीत मृत्यू, जीपनं विरुद्ध दिशेनं येणार्‍या ऍक्टिवाला दिली जोरदार.

कोरोनाचं संकट आणखी गडद

राज्यात कोरोनाचं संकट आणखी गडद, नव्या 265 रूग्णांची भर, 1 हजार 716 सक्रिय रूग्ण.

चोडणकर यांच्या याचिकेवर सुनावणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकाप्रकरणी 5 एप्रिलला सभापतींच्या दालनात सुनावणी, गिरीश चोडणकर यांना नोटीस जारी, हजर राहण्याचे निर्देश.

करासवाड्यात पुन्हा फुटली जलवाहिनी

करासवाडा-म्हापशात पुन्हा फुटली जलवाहिनी, हजारो लिटर पाणी वाया, रस्त्याच्या कंत्राटदाराविरोधात लोकांत संताप.

ड्रग्सविरोधी पथकाची मोठी कारवाई

अमलीपदार्थ विरोधी पथकाची शिवोलीत कारवाई, संशयित बिप्लॉन बैन याच्याकडून 1 लाख 30 हजार किमतीचे अमलीपदार्थ जप्त, संशयिताला अटक.

कोठावळेंच्या बदलीला तात्पुरती स्थगिती

श्रीनेत कोठावळे यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती, दोन दिवसांपूर्वीच इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदी झाली होती बदली.

जांबावलीचा गुलालोत्सव यावर्षी मर्यादित

जांबावली येथील गुलालोत्सव यावर्षी मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत, धार्मिक विधी करून होणार शिमगोत्सव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून गर्दी टाळण्याचं लोकांना आवाहन.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढले

महाराष्ट्रात गुरुवारी 43 हजार 183 नवीन करोनाबाधित, 249 रूग्णांचा मृत्यू, 3 लाख 66 हजार 533 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण.

एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल!

शिवसेना खासदार संजय राऊतांकडून ममता बॅनर्जींचं कौतुक, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद उतरवली असली, तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण, सर्वांना पुरुन उरतील, असं म्हणत व्यक्त केला विश्वास.

मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवलं

मद्यधुंद ट्रकचालकानं रायगडात 8 जणांना उडवलं, 4 जण ठार, 1 अत्यवस्थ, रेवदंडा-रोहा मार्गावर मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार, लोकांनी चोप देऊन पोलिसांच्या केलं स्वाधीन.

राजस्थानमध्ये प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य विमा

राजस्थानमध्ये प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य विमा, देशातलं ठरलं पहिलंच राज्य, प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य विमा संरक्षण देण्याची घोषणा, नोंदणी प्रक्रिया सुरू.

फाळके जीवनगौरव पुरस्कार रजनीकांत यांना

सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली घोषणा.

महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी 2780 कोटी

महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी 2780 कोटी मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली घोषणा, नागपूरमध्ये दोन उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी निधी, कोकणवासीयांसाठीही आनंदाची बातमी.

प्लेऑफआधीच बाहेर पडणार सीएसके!

चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये प्लेऑफआधीच बाहेर पडण्याचं आकाश चोप्राचं भाकित, सीएसकेच्या फॅन्सकडून चोप्रावर सोशल मीडियावरून हल्लाबोल.

सीएसकेच्या हेजलवूडची माघार

धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला आणखी एक धक्का, ऑस्ट्रेलियन बॉलर जोश हेजलवूडनं घेतली आयपीएलमधून माघार.

सनरायझर्सकडून जेसन रॉयला संधी

सनरायझर्स हैदराबादकडून इंग्लंडच्या जेसन रॉयला संधी, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शनं माघार घेतल्यानं रॉयचं नशीब फळफळलं, लिलावात लागली नव्हती बोली.

अण्णांच्या शेवंताचा जलवा कायम

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसर्‍या पर्वात शेवंताची झलक, अण्णा नाईकांच्या शेवंताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक.

अभिनेत्री दिया मिर्झा होणार आई

बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झा होणार आई, सोशल मीडियावर फोटो पास्ट करत दिली माहिती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!