TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया रद्द

निवडणूक आयोगाकडून पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया रद्द, मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे, केपेत नवी प्रक्रिया, पाचही पालिकांमधील आचारसंहिताही रद्द, बिनविरोध निवडून आलेल्यांची निवड ठरली रद्दबातल.

केपे नगरपालिकेत नव्यानं आरक्षण

केपे नगरपालिकेच्या आरक्षणात अक्षम्य चूक, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभाग आरक्षित, केपेवासीयांचा डीएमए कार्यालयावर मोर्चा, नव्यानं आरक्षण जाहीर करण्याचं डीएमए संचालक गुरुदास पिळर्णकरांचं आश्वासन.

कर्नाटक पोलिसांकडून सापत्न वागणूक

म्हादई नदीच्या पाहणीवेळी कर्नाटक पोलिसांकडून गोव्याला सापत्नभावाची वागणूक, अधिकारी, पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांना केला अटकाव, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या त्रिसदस्यीय उच्चाधिकारी समितीची कणकुंबीला भेट.

दिवसभरात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू, 100 नवे रूग्ण, शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव.

बॉक्साईटच्या वाहतुकीमुळे वास्कोत प्रदूषण

वास्कोत बॉक्साईटच्या वाहतुकीमुळे मुरगाव बंदराचे प्रवेशद्वार क्रमांक नऊ ते चिखली चौकपर्यंतच्या भागात प्रदूषण, धुळीमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम, समाज कार्यकर्ते गजानन कामत यांची मुरगावच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार.

चोरीप्रकरणी तिघा युवकांना अटक

ठाणे-कुठ्ठाळीतील चोरीप्रकरणी वेर्णा पोलिसांकडू तीन युवकांना अटक, घड्याळं, मोबाईल साहित्य, स्पीकर आदी मुद्देमाल हस्तगत, अक्षय तलवार, अस्लम जफर मोमीन आणि सर्वेश कुमार बहादूर अटकेत.

जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण

केंद्र सरकारकडून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर, 15 वर्षं जुनी वाहनं 1 एप्रिल 2022 पासून निघाणार भंगारात, वाहनांसाठी फिटनेस चाचणीचे नवे निकष जारी.

महाराष्ट्रात नव्या मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नव्या मार्गदर्शक सूचना जारी, खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवण्याची सूचना, सार्वजनिक कारणाखाली गर्दी न करण्याचे स्पष्ट निर्देश.

महाराष्ट्रात दिवसभरात 70 मृत्यू

महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा ओलांडला 25 हजारांचा टप्पा, दिवसभरात 70 मृत्यूंची नोंद, गेल्या 3 दिवसांमध्ये 74 हजाराहून जास्त नवे करोनाबाधित.

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या!

समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी, पुणे महानगरपालिकेने संमत केला ठराव.

चहापत्ती वेचणार्‍या महिलांसोबत सहभोजन

आसाममध्ये चहापत्ती वेचणार्‍या महिलांसोबत राहुल गांधी यांचं सहभोजन, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारादरम्यान केलं हितगुज, मजूर महिलांसोबत गप्पा मारतानाचे व्हिडीओ व्हायरल.

‘टीसीएस’च्या कर्मचार्‍यांचे अच्छे दिन

‘टीसीएस’च्या कर्मचार्‍यांना अच्छे दिन, सहा महिन्यांत सलग दुसर्‍यांदा पगारवाढ, वेतनवाढ जाहीर करणारी टीसीएस ठरली पहिली आयटी सर्व्हिसेस कंपनी.

जिब्राल्टरमध्ये प्रत्येक नागरिकाला लस

जिब्राल्टर देश कोविड प्रतिबंधक लसीकरणात अव्वल, सर्व नागरिकांना लस देण्याचा पराक्रम, ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांच्याकडून दुजोरा.

एआयएमआयएमला पश्चिम बंगालमध्ये झटका

खासदार असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएमला पश्चिम बंगालमध्ये झटका, पक्षाचे प्रभारी झमीरुल हसन यांनी दिला राजीनामा, ममता बॅनर्जींना करणार सहकार्य.

राहुल गांधींची परखड टीका

नागपुरात जन्मलेली संघटना अख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय, राहुल गांधींची परखड टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे काढले वाभाडे.

अमेरिका विरुद्ध चीन, नवा वाद

अमेरिका आणि चीनच्या उच्चाधिकार समिती बैठकीत नवा वाद, कोरोना, तैवान, तिबेट आदी मुद्द्यांवरून मतभेद, जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची भीती.

फ्रान्समध्ये मर्यादित लॉकडाउनची घोषणा

फ्रान्समध्ये वाढती करोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान जीन कैस्टेक्स यांच्याकडून मर्यादित लॉकडाउनची घोषणा, पॅरिससह देशातील 16 ठिकाणी एका महिन्यांच्या लॉकडाउनचे निर्बंध, चार आठवड्यांसाठी लॉकडाउन लागू.

तब्बल आठ लाख कोटी रुपयांचा दणका

भांडवली बाजारात सलग पाच दिवस घसरण, गुंतवणूकदारांना तब्बल आठ लाख कोटी रुपयांचा दणका, मुंबई शेअर बाजारात चढ-उताराच्या अस्थिरतेत विक्रीत तेजी.

ओपेक देशांकडून तेल आयात कमी करणार

भारताची विनंती फेटाळणार्‍या ओपेक संघटनेत सहभागी देशांवर मोदी सरकार नाराज, तेल आयात कमी करण्याचा निर्णय, सर्वाधिक तेल आयात करणार्‍या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानी.

अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचा महत्त्वपूर्ण विजय

फ्यूचर समूह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल यांच्यादरम्यानच्या व्यवहाराला सुरुंग, सिंगापूरस्थित आपत्कालीन लवादाने दिलेला अ‍ॅमेझॉनची बाजू उचलून धरणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून कायम, अ‍ॅमेझॉन डॉट कॉमसाठी महत्त्वपूर्ण विजय.

गेलने मानले नरेंद्र मोदींचे आभार

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, कोरोना व्हॅक्सिन वेस्ट इंडिजला पाठवल्याबद्दल गेलनं व्यक्त केला आनंद.

सूर्यकुमार यादव एकदिवसीय संघात

मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी, टी-20तील धडाकेबाज फलंदाजीमुळे निवड, 23 मार्चपासून इंग्लंडविरुद्ध मालिका.

बॉक्सर निखत झरीन सेमीफायनलमध्ये

भारताची महिला बॉक्सिंगपटू निखत झरीन बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये, 51 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चमक, दोन वेळची विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा केला पाडाव.

‘तारक मेहता…’मधील दोघांना कोरोना

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दोघांना कोरोनाची लागण, सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीसह पत्नी हेमाली वकानीला देखील कोरोनाची लागण.

रितेश-जेनेलियाचा नवा फन व्हिडिओ

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया डिसोझाचा नवा फन व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री प्रिती झिंटाला आलिंगन दिल्याबद्दल रितेशला जेनेलियाकडून पंच, चाहत्यांकडून व्हिडिओला पसंती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!