TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

जाहीर प्रचार संपला, शनिवारी मतदान

सहा नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी जाहीर प्रचार संपुष्टात, शनिवारी मतदान, व्यक्तिगत पातळीवर प्रचारासाठी मुभा.

मुख्य निवडणूक आयुक्तपदी रमणमूर्ती

राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांची वर्णी, राज्यपालांनी अनुमती दिल्यानंतर स्वीकारला पदभार, माजी आयएएस अधिकारी रमणमूर्ती होते राज्याच्या नागरी सेवेत.

भाग्यश्री पाडलोस्कर वर्ल्डकपसाठी ज्युरी

म्हापशाच्या भाग्यश्री पाडलोस्कर यांंची शुटिंग वर्ल्डकपसाठी ज्युरी सदस्यपदी निवड, गोव्याच्या पहिल्या शुटिंग कोच असलेल्या भाग्यश्री यांच्या निवडीनं राज्याच्या शीरपेचात मानाचा तुरा, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन.

सुदिन ढवळीकरांची सरकारवर प्रखर टीका

मगोप नेते सुदिन ढवळीकरांची सरकारवर प्रखर टीका, प्रशासकीय पातळीवर सरकार कोलमडलं, आचारसंहितेत अर्थसंकल्प सादर करणं अयोग्य, गोवा सरकारनं म्हादई कर्नाटकला दिल्याचा घणाघात.

गोवा लोकसेवा आयोगाकडून अन्याय!

गोवा लोकसेवा आयोगाकडून प्रिन्सिपल पदाच्या भरतीत स्थानिक उमेदवारावर अन्याय, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना आरक्षित असणार्‍या नोकर्‍या इतरांना दिल्या, डॉ. शिवाजी शेट यांचा आरोप.

पैसे उकळणार्‍या हरवळेच्या महिलेला अटक

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळणार्‍या हरवळेच्या दीपश्री सावंत उर्फ दीपश्री वासू गावसला वाळपई पोलिसांकडून अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी.

चरावणे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई

सत्तरी तालुक्यातील चरावणे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई, नागरिक संतप्त, वाळपई पाणी पुरवठा कार्यालयात तक्रारी, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास करणार आंदोलन.

कचरा प्रक्रियेसाठी वेर्णा आयडीसीमध्ये प्रकल्प

प्लास्टिक आणि सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीत उभारणार प्रकल्प, कचरा व्यवस्थापन महामंडळाचा पुण्याच्या ट्रिओ-कॅम सुक्रोटेक इंजिनिअरींग अँड प्रोजेक्ट कंपनीशी सामंजस्य करार.

सत्तरी तालुक्याला हुकूमशाहीतून मुक्त करणार

सत्तरी तालुक्याला पिता-पुत्राच्या हुकुमशाही राजवटीतून मुक्त करणार, आरजीचे मनोज परब यांची पिसुर्लेत गर्जना, युवकांसह लोकांची लक्षणीय उपस्थिती.

भाजप पदाधिकार्‍याच्या मुलाला पोलिसांकडून अटक

बलात्कार आणि मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा भाजप पदाधिकार्‍याच्या मुलाला काणकोण पोलिसांकडून अटक, मुलीच्या घरी आणि खोतीगावला नेऊन मारहाण केल्याचा ठपका.

पणजीत रेस्टॉरंटचे 4 कर्मचारी कोविडबाधित

पणजीतील एका नामांकित रेस्टॉरंटचे चार कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह, हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश, राज्यात 24 तासांत 98 नवे रूग्ण.

देवी माया केळबाय पंचायतनचा कळसोत्सव

गांवकरवाडा-मयेच्या देवी माया केळबाय पंचायतनच्या कळसोत्सवाला प्रारंभ, सहा वर्षांनंतर परंपरेला पुन्हा सुरुवात.

आचारसंहितेत अर्थसंकल्प सादर करू नका!

नगरपालिका आचारसंहितेच्या काळात पूर्ण अर्थसंकल्प सरकारला सादर करू देऊ नका, विरोधकांचं राज्यपालांना निवेदन.

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सत्ता

भाजपचा बालेकिल्ला असणार्‍या जळगावमध्ये भाजपला मोठा हादरा, महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला शिवसेनेकडून सुरूंग, 27 नगरसेवक फुटल्यानं गामावली सत्ता, ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही केले शिवसेनेला मतदान.

साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षाचा वाण

सांगलीतील वडगावच्या द्राक्ष उत्पादकानं विकसित केला साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षाचा वाण, मोठ्या द्राक्षाला ग्राहकांचीही पसंती, चार किलोला चारशे एकावन्न रुपयांचा दर.

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी मुक्तता करा!

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल निश्चित मत नसल्यानं आरोपातून मुक्तता करा, शशी थरूर यांची मागणी.

शेतकर्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस द्या!

दिल्ली सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस द्या, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची मागणी.

वर्षभरात हटवणार देशभरातील टोलनाके

वर्षभरात हटवणार देशभरातील टोलनाके, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा, जीपीएस यंत्रणा आणि फास्टटॅगद्वारे वसूल करणार टोल.

अरुण गोविल यांचा भाजपात प्रवेश

रामायण मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल भाजपात, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रवेश.

बांग्लादेशमध्ये हिंदूंच्या घरांची नासधूस

बांग्लादेशमधील हिफाजत-ए-इस्लाम संघटनेच्या हजारो समर्थकांकडून हिंदू गावावर हल्ला, फेसबुक पोस्टमधून धर्मगुरुच्या वक्तव्याचा निषेध केल्यामुळे संतापलेल्या समर्थकांनी केली 80 घरांची नासधूस.

पदार्पणातच सूर्यकुमारचं दमदार अर्धशतक

भारताच्या सूर्यकुमारचं पदार्पणातच दमदार अर्धशतक, इंग्लंडविरुद्ध 57 धावांची झंझावाती खेळी, टीम इंडियानं वरच्या क्रमांकावर खेळण्याची दिलेल्या संधीचं केलं सोनं.

बायर्न म्युनिक, चेल्सी क्वार्टरफायनलमध्ये

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिक आणि चेल्सी क्वार्टरफायनलमध्ये, म्युनिकनं लाजिओला, तर चेल्सीनं अ‍ॅटलिको माद्रिदला हरवत मिळवलं अंतिम आठ संघात स्थान.

भारताच्या निखत झरीनचा पराक्रम

भारताच्या निखत झरीनकडून गतविजेत्या रशियाच्या बॉक्सिंगपटूला मात, बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, 51 किलो वजनी गटाच्या सामन्यात पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 फरकानं केलं पराभूत.

‘हाथी मेरे साथी’ चित्रपट लवकरच

मराठी अभिनेत्री श्रीया पिळगावकर झळकणार ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटात, ‘बाहुबली’फेम अभिनेता राणा डग्गुबतीसोबत काम करतानाचा अनुभचा श्रीयानं केला शेअर.

‘राम सेतू’साठी अक्षय कुमार अयोध्येत

अभिनेता अक्षय कुमार ‘राम सेतू’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी अयोध्येत, श्री रामांची आरती सुरू असल्याचा फोटो पोस्ट करत आशीर्वाद मिळाल्याची भावना अक्षयकडून व्यक्त.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!