5 मिनिटांत 25 बातम्या

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
अपात्रता याचिकांवरील निवाडा लटकला
फुटीर आमदारांच्या अपात्रता याचिकांवर 26 रोजी अंतिम निवाडा अशक्य, कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळेच सुनावणींना विलंब, सभापतींचे सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्टीकरण.
नगरपालिका आरक्षणात बदल नाही?
पालिका आरक्षणावरून हायकोर्टात युक्तिवाद पूर्ण, दोन दिवसांत निकाल अपेक्षित, हस्तक्षेप करण्यास निवडणूक आयोगाची असमर्थता, तर राज्य सरकारनं ठेवलं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर बोट.
दिगंबर कामतांचा तारखांना आक्षेप
अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून, मात्र विरोधी पक्षनेते दिगंबर कामत सरकारवर नाराज, अधिवेशन काळात ख्रिस्तीबांधवांचे सण येत असल्यानं तारखा बदलण्याची मागणी.
गोवा माईल्सवर बंदी घाला!
खासगी टॅक्सीचालकांच्या पोटावर पाय देणार्या गोवा माईल्सवर तत्काळ बंदी घाला, राज्यभरातील टॅक्सीचालक एकवटले, वाहतूक संचालकांची भेट न झाल्यानं नाराजी.
बाबू आजगावकरांकडून उमेदवार जाहीर
पेडणे नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी जाहीर केलं पॅनल, पालिका क्षेत्रातील लोकांच्या उत्कर्षासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही.
सांत जासिंतो बेटावरील रहिवासी एकवटले
चिखलीतल्या सांत जासिंतो बेटावरील रहिवासी एकवटले, बेटावर घरे नसल्याचा दावा करत एमपीटीकडून बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप, मेजर पोर्ट बिलावरून स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात.
राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेच्या पथकानं घेतले नमुने
राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेच्या पथकानं घेतले म्हादई नदीतील पाण्याचे नमुने, पाण्यातील खारटपणाची चाचणी करण्यासाठी कणकुंबी ते पणजीपर्यंतच्या म्हादई नदीतील पाणी तपासणार.
महाराष्ट्रात जाताना कोविड चाचणी बंधनकारक
गोव्यातून महाराष्ट्रात जाताना कोविड चाचणी बंधनकारक, कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रानंही जारी केली एसओपी, सीमा भागातील गोमंतकीयांसह सिंधुदुर्गमधील कामगारांना ठरणार जाचक.
मुख्यमंत्र्यांनी ऐकली दक्षिण गोव्यातील गार्हाणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ऐकली दक्षिण गोव्यातील जनतेची गार्हाणी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारली निवेदने, कार्यवाही करण्याचे अधिकार्यांना आदेश.
गोव्यात ‘मेरिटाईम इंडिया समिट 2021’
गोव्यात तीन दिवशीय दुसर्या ‘मेरिटाईम इंडिया समिट 2021’चं होणार आयोजन, आभासी पद्धतीन दोन ते चार मार्च दरम्यान पार पडणार परिषद, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मेरिटाईम इंडिया’ समिटचं आयोजन.
ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्चपासून लस
देशभरात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा.
खासगीकरणाच्या धोरणांचं मोदींनी केलं समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगीकरणाच्या धोरणांचं केलं समर्थन, आजच्या युगात सर्वाजनिक कंपन्या सरकारनं स्वत:कडे ठेवणं शक्य नसल्याचं केलं स्पष्ट, करदात्यांचा पैसा विकासकामांवर खर्च करण्याचं व्यक्त केलं मत.
सरदार पटेल स्टेडियमच्या नामांतरावरून वाद
अहमदाबाद मोटेरातल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमच्या नामांतरावरून वाद, स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव दिल्यानं काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध, स्टेडियमचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन.
…तर पेट्रोल-डिझेलच्या किमती निम्म्यावर
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या अंतर्गत आणल्यास होणार सर्वसामान्यांना फायदा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इंधन मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले संकेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत मोठे दंगाबाज
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत मोठे दंगाबाज, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा घणाघात, हुगलीतील प्रचारसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल.
गोव्याचा सलग तिसरा पराभव
विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा सलग तिसरा पराभव, छत्तीसगडकडून आठ गड्यांनी धुव्वा, बडोदा आणि गुजरातनंही यापूर्वी केला एकतर्फी पराभव.
अक्षर पटेलचा बॉलिंगमध्ये ‘षटकार’
तिसर्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात, अक्षर पटेलनं घेतल्या सहा विकेट, झॅक क्रावलेची एकाकी अर्धशतकी झुंज.
राहुल गांधींच्या व्हिडिओतून इंग्लंडवर निशाणा
बॅटिंगमध्ये ढेपाळलेल्या इंग्लंडची विरेेंद्र सेहवागकडून खिल्ली, राहुल गांधींचा जुना व्हिडिओ पोस्ट करत इंग्लंडच्या बॅट्समनना काढले चिमटे.
टायगर वूड्सच्या कारला भीषण अपघात
जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्सच्या कारचा भीषण अपघात, लॉस एंजलिसमधील अपघातात वुड्स यांच्या पायाला इजा झाल्यानं गंभीर जखमी.
मुंबईचा महाराष्ट्रावर मोठा विजय
कॅप्टन श्रेयस अय्यरचं दिमाखदार शतक आणि अनुभवी बॉलर धवल कुलकर्णीच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईचा महाराष्ट्रावर विजय, सहा विकेट आणि 16 चेंडू राखून सहज धुव्वा.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणाबाहेर
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणाबाहेर, 24 तासांत आढळले तब्बल 9 हजार रूग्ण, अन्य राज्यांतून येणार्या प्रवाशांवर निर्बंध.
चीनी वॅक्सिनला श्रीलंकेचा नकार
चीननं विकसित केलेल्या कोरोना वॅक्सिनला श्रीलंकेचा नकार, चीनच्या वॅक्सिन डिप्लोमसीला बसणार फटका.
रत्नागिरी हापूसची लंडनमध्ये धूम
रत्नागिरी हापूसला लंडनमध्ये विक्रमी भाव, एक डझन आंब्यांना तब्बल पाच हजारांची किंमत, ग्लोबल कोकणच्या प्रयत्नांतून आंब्यांची लंडनवारी.
अभिनेत्री नोरा फतेहीनं उलगडला प्रवास
भारतीय सिनेक्षेत्रात पाय रोवण्यासाठी करावा लागला संघर्ष, कॅनडातून भारतात आल्यानंतर ओळख निर्माण करण्यासाठी तब्बल पाच वर्षं लागल्याची नोराची कबुली.
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा
‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत अभिनेत्री आलिया भट्टनं केली सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा, सिनेमाचा टीझर रिलीज, 30 जुलैला होणार सिनेमा प्रदर्शित.