TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

गोवन वार्ता लाईव्हच्या बातमीचा दणका

गोवन वार्ता लाईव्हच्या दणक्यानंतर जीएमसी प्रशासनाला खडबडून जाग, बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला मिळाली खाट, परप्रांतीय असल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकानं ठेवलं होतं वॉर्डबाहेर.

आचारसंहितेतही अर्थसंकल्प मांडणारच!

आचारसंहिता असली तरी 24 मार्चला विधानसभेत सादर करणार पूर्ण अर्थसंकल्प, फक्त लेखानुदान सादर करण्याची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, गुरुवारी नव्या निवडणूक आयुक्तांची घोषणा.

गर्गविरोधात केंद्रीय गृह सचिवांकडे तक्रार

वादग्रस्त माजी राज्य निवडणूक आयुक्त तथा आयएएस अधिकारी चोखाराम गर्ग अडचणीत, गर्ग यांच्याविरोधात काँग्रेसची केंद्रीय गृह सचिवांकडे लेखी तक्रार, नगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील घोळ भोवण्याची शक्यता.

पणजीत भाजपविरोधात राजकीय आघाडी

पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षाची अनपेक्षित चाल, भाजपमधीर नाराजांसह सुरेंद्र फुर्तादोंच्या गटाला एकत्र आणण्यात यश, भाजपसमोर तगडं आव्हान.

पुण्यतिथीनिमित्त मनोहर पर्रीकरांना आदरांजली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना दुसर्‍या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर आदरांजली, पर्रीकरांचा आदर्श घेऊनच राज्याचा विकास करण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही.

सकूभाट-सुरावलीत अज्ञात तरुणाचा खून

सकूभाट-सुरावलीत 35 वर्षीय अज्ञाताचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, मृतदेहावर जखमा आढळल्यानं कोलवा पोलिसांकडून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद,

दाबोळी विमानतळावर टॅक्सीचालकाला मारहाण

दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची बेकायदा वाहतूक करणार्‍या टॅक्सीवाल्यांकडून टॅक्सीचालक गुरू कांबळीला जबर मारहाण, युनायटेड टॅक्सीमेन असोसिएशनकडून दाबोळी विमानतळ प्राधिकरणासह वास्को पोलिस स्थानकात तक्रार.

ट्रक घुसला दुकानांत, अनर्थ टळला

पेडणे बाजारपेठतल्या रेषा माशेलकर उद्यानाजवळील दोन दुकानांत घुसला ट्रक, इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सुदैवानंच टळली जीवितहानी.

अस्नोड्यात खासगी टॅक्सी काऊंटरला विरोध

अस्नोड्यातल्या महिंद्रा क्लब हॉटेलवर खासगी टॅक्सी काऊंटर उभारण्यास स्थानिकांचा विरोध, गावातील टॅक्सीवाल्यांकडून सहकार्य करण्यास नकार, गावातील टॅक्सीवाल्यांनाच व्यवसाय करण्यास मुभा देण्याचं हॉटेल व्यवस्थापनाचं आश्वासन.

कंटेनरखाली सापडून युवकाचा मृत्यू

गिरी-म्हापसा इथल्या ग्रीन पार्क जंक्शनवरील फ्लाय ओव्हरनजीक कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून युवकाचा मृत्यू, चुकीच्या दिशेने फ्लायओव्हरखालील जंक्शनवर दुचाकी नेण्याचा प्रयत्न करताना अपघात, पर्वरीच्या अलाउद्दिन मानकुट्टीचा मृत्यू.

विक्रम भांगले, युवराज साळोखे यांची निवड

विक्रम भांगले, युवराज साळोखे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड, गोव्याचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक आणि ज्युरी अ‍ॅड. विक्रम भांगले यांची दिल्लीत होणार्‍या जागतिक नेमबाजी स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून नियुक्ती, तर युवराज साळोखे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड.

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, दिवसभरात 23 हजार 179 करोनाबाधित वाढले, 84 रूग्णांचा मृत्यू, 1 लाख 52 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण.

पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली

सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली, गृहरक्षक दलामध्ये रवानगी, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती.

भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष अटकेत

विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा गोपनीय डाटा बेकायदेशीर मार्गानं मिळवून अब्जावधी रुपयांची फसवणूक, पोलिसांनी केला सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश, नऊजणांना अटक, भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणीचाही समावेश.

कुत्रं मेलं तरी नेते दु:खी होतात, पण…

मेघायलचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं सडेतोड विधान, शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकर्‍यांसंदभात व्यक्त केली चिंता, एखादं कुत्रं मेलं तरी नेते दु:खी होतात, मात्र तब्बल अडिचशे शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तरी कोणीच न बोलल्याबद्दल मलिक संतप्त.

जिन्सवरून भाजप मुख्यमंत्र्यांची अजब टीका

वादग्रस्त विधानामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत चर्चेत, पंतप्रधान मोदींची तुलना प्रभू रामाशी केल्यानंतर जिन्स वापरणार्‍या महिलांवर टिप्पणी, महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार? असा सवाल करत निर्माण केला वाद.

अजानविरोधात विद्यापिठाच्या कुलगुरूंची तक्रार

सकाळी मशिदीमध्ये होणार्‍या अजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंची लेखी तक्रार, अजानमुळे सकाळी झोपमोड होत असल्याबाबत संगीता श्रीवास्तव यांची प्रयागराजच्या जिल्हाधिकार्‍यांना लिहिलं पत्र.

भाजप खासदाराची दिल्लीत आत्महत्या

भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांची दिल्लीतील खासदार निवासात आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

हिंसाचारानं अमेरिकेत घबराट, 8 मृत्यूमुखी

अमेरिकेतील अ‍ॅटलांटा शहर आणि उपनगरात हिंसाचार, दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये आशियाई वंशाच्या महिलांचा समावेश, पोलिसांकडून 21 वर्षीय तरुणाला अटक.

30 प्रदूषित शहरांपैकी 22 शहरं भारतात

जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 22 शहरं भारतात, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर, आयक्यूएअर या स्विस संघटनेनं जाहीर केला अहवाल.

विराट कोहलीचा आगळा वेगळा विक्रम

नव्यानं जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर, एकदिवसीय क्रमवारीत प्रथम आणि कसोटीत पाचव्या क्रमांकावर, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल-5 फलंदाजांमध्ये, अशी कामगिरी करणारा विराट ठरला जगातील पहिलाच फलंदाज.

बुमराह परतणार मुंबई इंडियन्समध्ये

लग्न केल्यानंतर भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा परतणार मैदानात, आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बुमराह सज्ज, महिन्याच्या अखेरीस मुंबई इंडियन्समध्ये होणार सामील.

पाचव्या वनडेतही भारतीय महिलांचा पराभव

पाचव्या वनडेतही भारतीय महिलांचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1ने मालिका विजय, अर्धशतकी खेळीमुळे बोशला सामनावीर पुरस्कार.

मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात

अभिनेत्री मौनी रॉय लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेण्ड सूरज नंबियारसोबत बांधणार लग्नगाठ, सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

डेमीच्या आयुष्यातील भयानक गोष्टी

अमेरिकेची लोकप्रिय गायिका डेमी लोवाटोची डॉक्युमेंट्री लवकरच होणार प्रदर्शित, डॉक्युमेंट्रीत डेमीकडून अनेक धक्कादायक खुलासे, आयुष्यात घडलेल्या भयानक गोष्टी मांडणार जगापुढे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!