TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

वीज, पाण्यावरून शिवोलीवासीय आक्रमक

मार्ना-शिवोलीतील वीज आणि पाण्याच्या समस्येवरून ग्रामस्थ आक्रमक, खास ग्रामसभेत पंचायत मंडळासह पाणी पुरवठा विभाग आणि वीज खात्याचे अधिकारी धारेवर.

वारखंडेत कापूस गोदामात अग्नितांडव

वारखंडे-फोंडा इथल्या कापसाच्या शेडवजा गोदामाला आग, सुमारे तीन लाख रुपयांचं नुकसान, फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण.

एकाच दिवशी राज्यात 4 कोरोना बळी

मंगळवारी एकाच दिवशी राज्यात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला, बाहेरील राज्यांतून पर्यटकांचे लोंढे गोव्यात येत असल्यानं काळजीचा सूर.

मुरगावात कचर्‍याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुरगाव पालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचं काम ठप्प, कचरा संकलन केंद्रासह इतर भागांत कचरा साचल्यानं दुर्गंधी, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील जेसीबी नादुरुस्त झाल्यानं समस्या.

वास्को कचरा यार्डमधील आग नियंत्रणात

वास्को कचरा यार्डमध्ये अचानक आग लागल्यानं धावपळ, सुक्या कचर्‍याला आग लागल्यानं काही काळ गोंधळ, अग्निशामक दलान विझवली आग.

बागायतीला आग, ठेकेदारावर कारवाईची मागणी

धारगळमधील नियोजित क्रीडा नगरीच्या बाजूला असलेल्या बागायतीला आग, ठेकेदार नितेश रेवोणकरविरुद्ध पेडणे पोलिसांनी तक्रार नोंदवण्याची मागणी, अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा श्रीपाद परब यांचा इशारा.

नावशी मरिना रद्द करण्याची ती थाप!

नावशीतील मरिना प्रकल्प साकारण्याबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, ‘आप’चे नेते राहुल म्हांबरेंचा गौप्यस्फोट, मरिना प्रकल्प रद्द केल्याची सरकारनं थाप मारल्याचा आरोप.

म्हादई निवाडा उल्लंघन चौकशीसाठी समिती

म्हादई निवाडा उल्लंघनाच्या चौकशीसाठी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रानं केली उच्चस्तरीय समिती सदस्यांची नेमणूक, पुढील प्रक्रियेला सुरुवात.

खासगी बसवाल्यांना गडकरी भेटणार

गोव्यातील खासगी बस व्यावसायिकांशी बैठकीला नितीन गडकरी यांची समंती, दिल्लीत होणार भेट, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची मध्यस्थी यशस्वी.

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येईना

महाराष्ट्रात मंगळवारी सापडले 15 हजार 51 नवे कोरोनाबाधित, 48 रूग्णांचा मृत्यू, दिवसभरात 10 हजार 671 रूग्ण कोरोनामुक्त.

पी. सी. चाको राष्ट्रवादीत दाखल

केरळमधील काँग्रेस नेते तथा माजी खासदार पी. सी. चाको राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल, गटबाजीचं कारण देत काँग्रेसला केला होता रामराम, शरद पवारांनी केलं पक्षात स्वागत.

पंतप्रधानांचे सल्लागार सिन्हांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती समोर, सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी केलं होतं नियुक्त.

स्वपन दासगुप्त यांचा राज्यसभेचा राजीनामा

स्वपन दासगुप्त यांचा राज्यसभेचा राजीनामा, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार म्हणून नाव जाहीर, तृणमूल काँग्रेसनं केली होती ‘अपात्र’ घोषित करण्याची मागणी.

कोणतंही कारस्थान रोखू शकत नाही!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यापासून कोणतंही कारस्थान रोखू शकत नाही, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचं सडेतोड उत्तर, भाजपविरुद्धचा लढा सुरूच ठेवण्याचा इरादा केला स्पष्ट.

बॅनर्जींचा अर्ज नाकारा : अधिकारी

ममता बॅनर्जींनी उमेदवारी अर्जात 6 गुन्हेगारी प्रकरणं जाहीर न केल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारा, नंदीग्राम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांची मागणी.

लष्कर भरती भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे

सेवा निवड मंडळामार्फत लष्करात भरतीतील कथित भ्रष्टाचाराबद्दल अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर गुन्हे, लेफ्टनंट कर्नल दर्जाचे 5 अधिकारी, 12 इतर कर्मचारी आणि 6 नागरिकांवर गुन्हा दाखल केल्याची सीबीआयची माहिती, दिल्ली लष्करी छावणीतील बेस हॉस्पिटलसह देशभरातील 13 शहरांमधील 30 ठिकाणांवर छापे.

पेट्रोल-डिझेलमधून नफा कमवला!

6 मे 2020 पासून प्रति लिटर पेट्रोलमागे 33 रुपये, तर डिझेलमागे 32 रुपयांचा महसूल कमावला, मोदी सरकारची कबुली, वर्षभरात केंद्राची कमाई प्रति लिटर पेट्रोलमागे 13 रुपयांनी, तर डिझेलमागे 16 रुपयांनी वाढली.

कराचीतील बॉम्बस्फोटात एक ठार

पाकिस्तानमधील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, पाकिस्तान अर्धसैनिक दलातील जवानाचा मृत्यू, दहा जण जखमी, बलूच लिब्रेशन आर्मीनं घेतली हल्ल्याची जबाबदारी.

चक्क हेलिकॉप्टरमधून पैशांचा पाऊस

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात चक्क हेलिकॉप्टरमधून पैशांचा पाऊस, लग्न समारंभात वर्‍हाडी मंडळींवर पैशांचा वर्षाव, व्हिडिओ व्हायरल.

जॅक मा यांना चीन सरकारचा झटका

अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आणि चीनमधील श्रीमंत उद्योजक जॅक मा यांना चीन सरकारचा झटका, मीडिया मालमत्ता विकण्याचे आदेश, वॉल स्ट्रिट जर्नलनं केला गौप्यस्फोट.

ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस सुरक्षित

कोविड प्रतिबंधासाठी तयार केलेली ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस सुरक्षित, अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ब्रिटनच्या औषध नियंत्रक संस्थेचा दावा, रक्तात गुठळ्या होऊन काही लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर युरोपीय देशांनी लशीचा वापर थांबवला.

जो बायडेन यांना उत्तर कोरियाची धमकी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना उत्तर कोरियाची थेट धमकी, किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेला दिला इशारा, तुमची झोप उडेल असा कोणताही निर्णय घेऊ नका, अशा शब्दांत खडसावलं, दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता.

यूएईचे दोन क्रिकेटपटू निलंबित

आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कोडचा भंग केल्याच्या आरोपाखाली यूएईचे दोन क्रिकेटपटू आठ वर्षांसाठी निलंबित, मोहम्मद नावेद आणि शायमान अन्वर बट यांच्यावर कारवाई, 2019च्या टी-20 विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सामन्यांदरम्यान भ्रष्टाचार केल्याचं समोर.

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ लवकरच

दिग्दर्शक अभिषेक शर्मा आणि अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ लवकरच चित्रपट लवकरच भेटीला, 18 मार्चला अक्षय जाणार अयोध्येत, राम जन्मभूमीवरूनच चित्रपटाच्या शूटिंगला करणार सुरुवात.

प्राजक्ता माळीनं शेअर केला व्हिडिओ

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं शेअर केला लहानपणीचा व्हिडिओ, नृत्य करतानाच्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!