Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

वागातोरमध्ये रेव्ह पार्टी उधळली

वझरांत वागातोरमध्ये एनसीबीचा छापा, रेव्ह पार्टी उधळली, पाच जणांना अटक, तर लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त.

दोन अपघातांत एक ठार, तिघे जखमी

मालवणमधील अपघातात पेडण्याचा युवक मृत्युमुखी, भरधाव मोटारसायकलची कारला धडक बसल्यानं अपघात, तर बेतोड्यात दोन मोटारसायकलची टक्कर, अपघातात तिघे जखमी.

हेदोडेत कोट्यवधींचे खांब चोरीस

सत्तरीतल्या नगरगाव पंचायत क्षेत्रातील हेदोडे पुलावरील खांब चोरीला, कोट्यवधी रुपये खर्चून घातलेले खांब गायब झाल्यानं संताप, सखोल तपासाची मागणी.

महादेव जोशी यांच्या कुटुंबीयांना मदत

प्रेस क्लब ऑफ गोवातर्फे सत्तरी तालुक्यातील दिवंगत पत्रकार महादेव जोशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, जोशी यांच्या पत्नी आणि आईकडे धनादेश सुपूर्द.

व्हाईस अ‍ॅडमिरल हरि कुमार यांची गोवा भेट

पश्चिम नौदल विभागाचे ध्वजाधिकारी आणि प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार गोव्यात, दोन दिवशीय गोवा भेटीत गोवा नौदल विभागाच्या कामकाजाची केली पाहणी.

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते वाहनांचे वितरण

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना शववाहिनी आणि कचरा उचलण्यासाठीच्या वाहनांचे हस्तांतर, विधानभवन परिसरातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती, खासदार निधीतून 45 लाख रुपयांची वाहनं पंचायतींना हस्तांतरित.

महाराष्ट्र-कर्नाटकमधील वाद चिघळला

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद पुन्हा चिघळला, दोन्ही राज्यांनी एसटी बसेसची वाहतूक केली बंद, सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर.

कोकणातील शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट

कोकणातील शिमगोत्सवावरील कोरोनाचे ढग गडद, यंदाचा शिमगोत्सव महामारीमुळे साध्या पद्धतीने, शिमगोत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली.

म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्षपदी फडणवीस

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड, वडाळा-मुंबईतल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते.

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रातील जनतेला इशारा

कोरोनाचे नियम पाळा, कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला इशारा, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नियम पाळण्याचं आवाहन.

प्रत्येक 5 करोना रुग्णांमध्ये 3 महाराष्ट्रातील

देशातील प्रत्येक 5 करोना रुग्णांमध्ये 3 महाराष्ट्रातील असल्याचं धक्कादायक चित्र, 24 तासांत 16 हजार रुग्णांची वाढ, निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र.

रेखा जरे खूनप्रकरणी बाळ बोठे अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती, मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा, शनिवारी पहाटे बोठेला हैदराबादेत पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

रतन टाटांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, लस घेतल्यानंतर टि्वटरद्वनारे व्यक्त केली प्रतिक्रिया, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेणं खूपच सहज आणि वेदनारहित असल्याचं केलं नमूद.

गौतम अदानींवर राहुल गांधींचा निशाणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर साधला निशाणा, टि्वटर अकाऊंटवरून राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न, अदानींची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढल्याचं नमूद करत साधला तीर.

यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये देणार साथ, भाजपसमोर आव्हान.

दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग

दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आगीचा भडका, इमर्जन्सी ब्रेक लावून थांबवली गाडी, सुदैवानं टळला मोठा अनर्थ.

…तर विमानातून खाली उतरवणार!

मास्क नीट लावलेला नसेल, तर विमानातून खाली उतरवणार, ‘डीजीसीआय’कडून घेण्यात आला कठोर निर्णय.

श्रीलंकेमध्ये लवकरच बुरखा घालण्यावर बंदी

श्रीलंकेमध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी, जनसुरक्षा मंत्री सरथ वीरसेखरा यांची घोषणा, श्रीलंकेतील 1 हजारहून अधिक मदरशांवर बंदी घालण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचं केलं जाहीर.

‘ऑक्सफर्ड’ लस सुरक्षितच

कोरोना प्रतिबंधक ‘ऑक्सफर्ड’ लस सुरक्षितच, रक्तातील गुठळ्यांशी संबंध नाही, जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण.

अमेरिका 4 जुलैपर्यंत कोरोनामुक्तीच्या समीप

अमेरिका 4 जुलैपर्यंत कोरोनामुक्तीच्या समीप, 1 मे पर्यंत सर्व प्रौढांना लस घेण्याची परवानगी देऊन त्यांचे लसीकरण करण्याचं उद्दिष्ट.

मुंबई सीटी एफसी आयएसएल विजेते

मुंबई सीटी एफसीनं मिळवलं आयएसएल विजेतेपद, एटीके मोहन बागानला 2-1 गोलफरकानं पराभूत करून मिळवलं पहिलं जेतेपद.

दक्षिण आफ्रिकेची भारतीय महिलांवर सरशी

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची भारतीय महिलांवर सरशी, भारताचं 249 धावांचं आव्हान पार करताना लिझेलीच्या नाबाद 132 धावा.

बुमराहच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात, स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशनशी करणार लग्न, अभिनेत्री तारा शर्मा सलुजानं सोशल मीडियावर पोस्ट करत केलं बातमीवर शिक्कामोर्तब.

के. एल. राहुलचं अफलातून क्षेत्ररक्षण

के. एल. राहुलनं इंग्लंडविरुद्ध केलं अफलातून क्षेत्ररक्षण, सर्वचजण झाले अवाक, हवेत झेप घेत अडवला षटकार, व्हिडिओ व्हायरल.

सलमान खानचा नवा हटके लूक

अभिनेता सलमान खानचा नव्या चित्रपटातला लूक बॉडीगार्ड शेरानं केला सोशल मीडियावरून व्हायरल, आगामी ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटातील फोटोला पसंती, मुळशी पॅटर्न सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!