Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

मगोपकडून एक अपात्रता याचिका मागे

मगोपच्या बंडखोर आमदारांसंदर्भात केलेल्या दोनपैकी एक याचिका मागे, आमदार सुदिन ढवळीकरांची माहिती, तर सुनावणीनंतर आता सभापती काय निर्णय देणार, याची प्रतीक्षा.

एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ का?

चिखलीच्या पंच स्टेफनी लुकास यांच्यासह युवकाला धमकावल्याच्या प्रकाराचा गोंयचो आवाज संघटनेकडून निषेध, पोलिसांनी एफआयआर नोंद न केल्यानं तीव्र नाराजी.

डबल मर्डरमधील संशयितांना पोलिस कोठडी

दुहेरी हत्याकांडप्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी, कामाचे पैसे न दिल्यानं मजुरांनीच मालकांची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड.

रामराव वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी

कदा अकादमीचे थिएटर आर्ट प्रिन्सिपल रामराव वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी, गोवा विद्यापिठाच्या परफॉर्मिंग, फाईन आर्ट आणि म्युझिकच्या कुलगुरुपदी नेमणूक.

कोलवाळ ग्रामसभेत कचरा शेडला विरोध

कोलवाळ ग्रामसभेत कचरा शेडला तीव्र विरोध, सरपंचांच्या स्पष्टीकरणावर ग्रामस्थ असमाधानी, कचरा शेडच्या विरोधात ठराव, भंगारअड्ड्यांचाही विषय तापला.

केरी-सत्तरी सरपंचपदी दाऊद अब्दुल घनी सय्यद

केरी-सत्तरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दाऊद अब्दुल घनी सय्यद यांची बिनविरोध निवड, गोविंद मोहन गावस यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद होतं रिक्त.

रिव्होल्यूशनरी गोवन्सची खरमरीत टीका

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेचा आरोप, फोंड्यातील पत्रकार परिषदेत गृह खात्यावर चौफेर टीका, कुडचडेतील गाडा जाळण्याच्या प्रकरणात सखोल तपास करण्याची मागणी.

महिला आयोगातर्फे महिला दिनी सत्कार

राज्य महिला आयोगातर्फे पणजीत महिला दिन उत्साहात, अखिल गोवा महिला स्वयंसाहाय्य गट संघटनेच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची उपस्थिती, विशाखा वेळीप आणि नंदिता डिसोझा यांचा गौरव.

सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपादकांचा सन्मान

कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपादकांचा सन्मान, मुख्य संपादक सागर चव्हाण यांचा नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कारानं गौरव.

कोरोना लसीकरणासाठी सरकारतर्फे मेगा कॅम्प

ज्येष्ठ नागरिकांसह 45 ते 59 वयोगटातील लोकांसाठी राज्यात 15 आणि 16 मार्चला कोरोना लसीकरण, सरकारतर्फे मेगा कॅम्पचं आयोजन, स्वयंपूर्ण मित्र, पंचायत सचिव आणि पंचांना कॅम्पबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार लबाड : फडणवीस

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रखर टीका, ठाकरे सरकार लबाड असल्याचा घणाघात, शेतकर्‍यांच्या वीज मीटरचं कनेक्शन कापण्याच्या प्रश्नावरून टीकास्त्र.

सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून बदली

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील कथित सहभागाच्या टीकेवरून पोलिस अधिकारी सचिन वाझेंची बदली, क्राईम ब्रँचमधून अन्यत्र बदली करण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा, विरोधकांकडून वाझे यांच्या अटकेची जोरदार मागणी.

अर्णब गोस्वामी प्रकरणामुळेच वाझे लक्ष्य!

अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक करण्यात सहभाग असल्यामुळेच पोलिस अधिकारी सचिन वाझे भाजपकडून लक्ष्य, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची टीका.

महाराष्ट्रात कांद्याच्या दरात घट

महाराष्ट्रात कांद्याच्या दरात किलोमागे 10 रुपयांनी घट, घाऊक बाजारात आवक वाढल्यानं मुंबईसह प्रमुख शहरांत कांद्याचे दर घसरले.

शर्जिल उस्मानीला कोर्टाचा दिलासा

अलिगढ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, शर्जिल तपासात सहकार्य करत असल्यास पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश, एल्गार परिषदेच्या 30 जानेवारीला पुण्यातल्या कार्यक्रमात शर्जिलनं केलं होतं हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य.

मुंबईत कोरोना लसीकरणानंतर वृद्धाचा मृत्यू

मुंबईत कोरोना लसीकरणानंतर काही मिनिटांतच वृद्धाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार, जोगेश्वरीतील 68 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल, तपासासाठी समितीची पालिकेकडून नियुक्ती.

लोककलाकारांना पंतप्रधानांकडून शाबासकी

ट्विटरवर लोककलाकारांच्या व्हायरल व्हिडिओची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल, बहोत बढीया अशी प्रतिक्रिया देत दिली शाबासकी.

दिल्लीतील सरकार करतं रामराज्याचं अनुकरण

दिल्लीतील सरकार रामराज्याचं अनुकरण करत असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, आपण हनुमान भक्त असल्याचंही केलं वक्तव्य, अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यांनतर दिल्लीतील वयोवृद्ध लोकांना दर्शनासाठी नेण्याची घोषणा.

केरळमध्ये काँग्रेसला मोठा झटका

केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका, ज्येष्ठे नेते आणि माजी खासदार पीसी चाको यांचा राजीनामा, पक्षात गटबाजी माजल्यानं काम करणं अवघड झाल्याचं सांगत सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे पाठवला राजीनामा.

उत्तराखंड मुख्यमंत्रीपदी तिरथसिंह रावत

त्रिवेंद्रसिंह रावत पायउतार झाल्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तिरथसिंह रावत यांची वर्णी, भाजप श्रेष्ठींच्या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

टी-20 मध्ये टीम इंडिया दुसर्‍या स्थानी

ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटममध्ये टीम इंडिया दुसर्‍या स्थानावर, कसोटी क्रिकेटच्या मानांकनात अग्रस्थान कायम, तर वनडे मानांकनात दुसर्‍या स्थानी.

आयपीएलच्या मुंबईतील आयोजनावर प्रश्नचिन्ह

आयपीएलच्या सामन्यांचं मुंबईत आयोजन करण्याबाबत संभ्रम, कोरोबाधितांची संख्या वाढू लागल्यानं बीसीसीआयवर दबाव, रविवारी जाहीर होणार आयपीएलचं वेळापत्रक.

आशिया चषकाला भारताचा दुय्यम संघ?

कसोटी चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड दौर्‍यामुळे टीम इंडिया आशिया चषकाला पाठवणार दुय्यम संघ, व्यग्र वेळापत्रक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून सर्व शक्यतांचा आढावा.

महात्मा फुलेंचा जीवनपट पडद्यावर

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट लवकरच पडद्यावर, ‘महात्मा’ चित्रपटाची दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याकडून घोषणा.

अनुपम खेर यांच्याकडून शिवस्मरण

दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी घेतली कोविड लस, मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये लस घेताना केलं नामस्मरण, लसीकरणानंतर मानले आरोग्य कर्मचार्‍यांचे आभार.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!