Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

दाबोळीत जबरी चोरी, तिघांना अटक

दाबोळीतील बंगल्यात जबरी चोरी, चार चोरांनी घरमालकाला बांधून लुटल्या किमती वस्तू, वास्को पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौथ्याचा शोध जारी, लुटलेला ऐवज हस्तगत.

नगरपालिकांसाठी उमेदवारांची उमेद‘भारी’

पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 518 उमेदवारी अर्ज दाखल, म्हापशात 116, मडगावात 128, केपेत 73, सांगेत 46 आणि मुरगावात 155 अर्ज दाखल.

निवडणुकीतून 61 जणांनी घेतली माघार

महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतून 61 जणांनी घेतली माघार, पणजी महापालिकेसाठी 95 उमेदवार रिंगणात, डिचोली नगरपालिकेसाठी 68, वाळपईत 23, पेडणेत 37, कुंकळ्ळीत 66, कुडचडेत 48, तर काणकोणात 31 उमेदवार रिंगणात.

दोघा उमेदवारांची बिनविरोध निवड

नगरपालिका निवडणुकीत आणखी दोघांची बिनविरोध निवड, केपेत सुचिता शिरवईकर, तर मुरगावातून स्टेफनी लुकास बिनविरोध, केपेतील बिनविरोध निवडीबद्दल सुचिता शिरवईकरांचा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडून सन्मान.

वाहतूक संचालकांना घेरावाचा ठराव

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी खासगी बसचे मालक आक्रमक, वाहतूक संचालकांना सोमवारी घेराव घालण्याचा बैठकीत ठराव, सुदीप ताम्हणकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका.

आश्वेत समुद्रकिनारी बिल्डरनं हडपली जागा

आश्वेतल्या समुद्रकिनारी बिल्डरच्या कारवायांकडे पंचायतीचा काणाडोळा, मेसर्स कोचिन इस्टेट लिमिटेड कंपनीनं उभारलं कुंपण, पंचायतीकडून पाहणी करण्यास टाळाटाळ, राजकीय वरदहस्तामुळे बिल्डरकडून दादागिरी.

कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश

कोलवाळ जेलमधून पळून जाण्याचा कैद्यांचा प्रयत्न, जेलमधून गायब झाल्यानं पोलिसांची उडाली झोप, खून आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडले जेलच्याच छतावर.

मोपा लिंक रोड होऊ देणार नाहीच!

धारगळ ते मोपा विमानतळ जोड रस्ता कोणत्याही स्थितीत करू देणार नाही, धारगळ मोपा शेतकरी संघर्ष समितीचा इशारा, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जोड रस्ता सरकारवर दबाव आणून रद्द न केल्यास आजगावकरांना सभा घेऊ न देण्याचा इशारा.

सांकवाळ ग्रामसभेत सीझेडएमपीला विरोध

सांकवाळ पंचायतीच्या खास ग्रामसभेत किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा मसुद्याविरोधात ठराव, सरपंच रमाकांत बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेत स्वत:चा आराखडा नव्याने तयार करण्याचा निर्णय.

होंड्यात खडीवाहू ट्रकची घराला धडक

खडी वाहतूक करणारा ट्रक घरात घुसून होंडातील घराचं नुकसान, अवजड वाहतुकमुळे गावकरवाडा येथील नागरिकांच्या जिवाला धोका, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी.

पणजीत 45 नवे कोविड रूग्ण

पणजीत आठवडाभरात 45 नवे कोविड रूग्ण, चिंबल आणि मडगावातही रूग्ण वाढू लागल्यानं चिंता.

429 नव्या कोविड रूग्णांची नोंद

राज्यात एकाच आठवड्यात 429 नव्या कोविड रूग्णांची नोंद, मृतांचा आकडा 799 वर, राज्यात 700 सक्रिय रूग्ण.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढलं, दिवसभरात 10 हजार 187 नवे कोरोनाबाधित, 47 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, केंद्र सरकारची उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथकं महाराष्ट्रात रवाना.

हत्तीच्या हल्ल्यात युवक जखमी

तिळारीजवळच्या मोर्ले गावात हत्तीच्या हल्ल्यात युवक जखमी, काजू बागेत गेलेल्या विश्वनाथ बाबी सुतार याच्यावर हत्तीचा हल्ला, बांबोळीच्या जीएमसीत उपचारांसाठी दाखल.

राम मंदिरासाठी 2.5 हजार कोटींचा निधी

राम मंदिरासाठी जमा झाला तब्बल 2.5 हजार कोटींचा निधी, घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद, विश्व हिंदू परिषदेची माहिती.

सुवेंदू अधिकारी यांना ममतांविरोधात तिकीट

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मास्टर स्ट्रोक, ममता बँनर्जींच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांना तिकीट देण्याचं निश्चित, अधिकारी होते ममता यांचे निष्ठावंत सहकारी.

भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर अस्वस्थ

भाजप नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर यांची प्रकृती अस्वस्थ, विमानानं मुंबईतील रूग्णालयात हलविलं, एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची दुसरी वेळ.

इम्रान खाननी जिंकला विश्वासदर्शक ठराव

पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारनं संसदेत जिंकला विश्वासदर्शक ठराव, सरकार स्थिर झाल्यानं इम्रान यांना मोठा दिलासा.

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

चौथ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, 3-1च्या फरकानं जिंकली कसोटी मालिका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायनलमध्ये न्यूझिलंडसोबत जूनमध्ये भिडणार.

रिषभ पंत सामनावीर, अश्वीन मालिकावीर

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत झंझावाती शतक ठोकणारा रिषभ पंत सामनावीर, तर फिरकीवर इंग्लीश बॅट्समनना नाचवणार्‍या आर. अश्वीनला मालिकावीर पुरस्कार.

आयपीएलच्या उद्घाटनाची तारीख ठरली

आयपीएलच्या नव्या पर्वाला 9 एप्रिलपासून आरंभ होण्याची शक्यता, गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब, 30 मेला फायनल खेळवण्याचं निश्चित.

संघर्षपूर्ण लढतीनंतर मेरी कोमला कांस्यपदक

सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणार्‍या एमसी मेरी कोमला बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक, संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या विर्जिनिया फच्सकडून पराभूत.

निकोलस केजनं केलं पाचव्यांदा लग्न

‘घोस्ट रायडर’ चित्रपटातून जगभर पोचलेल्या हॉलिवूड अभिनेता निकोलस केजनं केलं पाचव्यांदा लग्न, वयाच्या 57व्या वर्षी 31 वर्षांनी लहान असलेल्या जपानी प्रेमिकेशी विवाहबंधनात.

‘मिशन मजनू’चा पहिला पोस्टर जारी

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आगामी चित्रपट ‘मिशन मजनू’चा पहिला पोस्टर जारी, शांतनू बागची यांच्या दिग्दर्शनाखाली रश्मिकाचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट, 70च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘मिशन मजनू’ चित्रपट.

तापसी पन्नू-अनुराग कश्यप ‘दोबारा’ एकत्र

आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नू पुन्हा कामात व्यग्र, तापसी पन्नू-अनुराग कश्यप यांनी पुन्हा सुरू केलं ‘दोबारा’चं शूटिंग, दिग्दर्शक अनुराग कश्यपनं टि्वट करून दिली माहिती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!