5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
गोव्यात कोरोना प्रादूर्भाव वेगाने
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, दरदिवशी अडिचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडू लागल्यानं चिंता, ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादूर्भाव.
एकाच दिवशी आढळले 247 रूग्ण
सोमवारी राज्यात आढळले 247 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू, राज्य सरकारकडून सतर्कता बाळगण्याचं नागरिकांना आवाहन.
एकूण अॅक्टिव्ह केसीस 2 हजार 180
राज्यात एकूण अॅक्टिव्ह केसीस 2 हजार 180 वर, उत्तर गोव्यात सर्वांधिक अॅक्टिव्ह केसीस पणजीत, दक्षिण गोव्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसीस मडगावमध्ये.
वाढत्या कोविड रूग्णांवर उपचार
बार्देस तालुक्यात 623, तर तिसवाडीत 308 कोविडबाधितांवर उपचार, सासष्टीत 474, मुरगावात 246, तर फोंड्यात 208 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू.
राज्यात कठोर निर्बंध कधी?
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचं वातार्वंरण, राज्यात सार्वजनिक व्यवहारांवर निर्बंध येण्याची शक्यता, पर्यटकांच्या वावरालाही आळा घालण्याची घोषणा शक्य.
प्रत्येकाने स्वत:हून काळजी घ्यावी!
राज्यात कोरोनाबाधित वाढत असल्यामुळं प्रत्येकानं स्वत:हून काळजी घ्यावी, लक्षणं दिसताच चाचण्या करा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं आवाहन, निर्बंध जारी करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण.
वाहतूक नियम पाळा, दंड टाळा!
वाहनं चालवताना नियम न पाळल्यास कापला जाणार खिसा, वाहतूक खात्याकडून दंडाचं नव परिपत्रक जारी, 16 एप्रिलपासून नवे नियम लागू.
मासळीची आवक घटल्यानं महागाई
गोंयकारांच्या ताटातील मासे गायब होण्याची भीती, वाढीव दर आणि दलालांच्या दादागिरीमुळे मासळी बाजाराला ओहोटी, आवक घटल्यानं दर भिडले गगनाला.
अपात्रतेवर 29 एप्रिलला अंतिम सुनावणी
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर 29 एप्रिलला अंतिम सुनावणी, मात्र सभापती राजेश पाटणेकरांवर विश्वास नसल्याचा गिरीष चोडणकरांचा आरोप.
नगराध्यक्षांविरोधातला अविश्वास ठराव रद्द
कुडचडे-काकोडा नगराध्यक्षांच्या विरोधातला अविश्वास ठराव रद्दबातल, नगरपालिका संचालकांच्या निर्णयानं भाजपला धक्का, तर नीलेश काब्रालांच्या विरोधात ‘आप’ची निदर्शनं.
साखळीत आढळलं जिवंत अर्भक
वाळपईनंतर साखळीत आढळलं जिवंत अर्भक, मल्टिपर्पज हॉलच्या मागच्या बाजूला अर्भक आढळल्यानं खळबळ, पोलिसांचा परिसरात कसून तपास.
स्विमिंग ट्रेनरचा मृतदेह सापडला
‘स्विम फॉर जस्टीस’साठी मांडवी नदी पोहून पार करतेवेळी बेती फेरी धक्क्याजवळ मांडवी नदीत स्विमिंग ट्रेनर बुडाला, सिकेरी-कांदोळीच्या मॅन्युअल परेराचा सापडला मृतदेह.
‘सीएमआयई’च्या विश्वासाहर्तेवरच प्रश्नचिन्ह
बेरोजगारीची आकडेवारी सादर करणार्या सीएमआयई संस्थेच्या विश्वासाहर्तेवरच प्रश्नचिन्ह, गोवा सरकारकडून गंभीर दखल, संस्थेकडून मागवणार स्पष्टीकरण.
क्षुल्लक कारणावरून मेरशीत गोळीबार
मेरशीत गोळीबाराचा प्रकार, क्षुल्लक कारणावरून बेतकी-माशेलच्या प्रसाद फडतेवर झाडली एकानं गोळी, जखमी तरुणाला गोमेकॉत केले दाखल.
गोवा इंजिनिअरिंग कॉलेज फर्मागुडीतच!
गोवा इंजिनिअरिंग कॉलेज फर्मागुडीतच, अन्य ठिकाणी नेण्याचा कोणताच प्रस्ताव सरकारसमोर नाही, काही राजकारणी खोट्या बातम्या पसरवून अस्तित्व दाखविण्याचा करतायत खटाटोप, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची टीका.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा अखेर राजीनामा
महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, हायकोर्टानं दिलेल्या चौकशीच्या निर्णयामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ.
दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे.
अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव, सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडले होते देशमुख.
शिर्डीचं साईसंस्थान 30 एप्रिलपर्यंत बंद
शिर्डीचं साईसंस्थान भक्तांसाठी बंद, वाढत्या कोरोनामुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय, 30 एप्रिलपर्यंत साई मंदिर राहणार बंद.
देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
देशभर कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, 24 तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण, 500 जणांचा मृत्यू, पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रमही निघाला मोडीत.
ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल
मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, भाजपवर साधला निशाणा.
आसाम, तमिळनाडू, केरळमध्ये मतदान
आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुचेरीत निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या, मंगळवारी मतदान, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मंगळवारी तिसर्या टप्प्याचं मतदान.
पुतीन यांची लोकप्रियता कायम
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता कायम, रशियामधील ‘सर्वांत देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान, 300 शहरांमध्ये करण्यात आलं सर्वेक्षण
क्विंटन डिकॉक वादात, आयसीसीकडून दंड
पाकिस्तानच्या बॅट्समन फखर झमानला फेक रनआऊट करणं दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकला पडलं महागात, आयसीसीकडून रोख रकमेचा दंड.
अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण
बॉलिवूड कलाकारांसह देशभरातील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण, अक्षय कुमार पाठोपाठ आलिया भट्ट, विकी कौशल, गोविंदा, भूमी पेडणेकर, आमीर खान, आर. माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, प्रियदर्शन जाधवला कोरोनाची बाधा.