पाच मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

वन निवासींना सरकारचा दिलासा

वनहक्क कायद्याखाली जमिनींचे दावे निकाली काढण्यासाठी सर्व्हेयर आऊटसोर्स करण्याचा सरकारचा निर्णय, 10 मार्चपूर्वी सरकार सादर करणार कोर्टात प्रतिज्ञापत्र.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक बसवा!

राज्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण कमी, जलदगतीनं तपास करून गुन्हे सिद्ध करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

जमिनीसाठी जीव गेला तरी बेहत्तर…

जीव गेला तरी मोपा लिंक रोडसाठी जमीन देणारच नाही, धारगळ मोपा संघर्ष समितीनं सरकारला ठणकावलं, सरकारनं भूसंपादनाची जबरदस्ती केल्यास उभारणार जनआंदोलन.

आरजीचे मनोज परब होणार तडिपार?

आरजीच्या मनोज परबांना तडिपार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा, चिथावणीखोर भाषणं दिल्याचा आरोप, मनोज परब म्हणतात, हे भाजप सरकारचं कारस्थान.

बेकायदा डोंगर कापणी पाडली बंद

गावरावाडा-कळंगुटमध्ये बेकायदा डोंगर कापणी पाडली बंद, कळंगुट कॉन्स्टिट्यूएन्सी फोरमची पोलिसांच्या मदतीनं कारवाई, भरारी पथकाकडे केली तक्रार.

कणकिरे-गुळेलीत बागायतदारांचे मोठे नुकसान

कणकिरे-गुळेलीत वादळामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता, कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी केली पाहणी, तातडीनं पंचनामे करून मंजुरीसाठी पाठवण्याचे कृषी संचालकांचे आदेश.

15 लाखांपेक्षा जास्त हानीचा अंदाज

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसह तलाठ्यांनीही केली कणकिरेत पाहणी, नुकसानीचा आकडा 15 लाखांवर गेल्याचा अंदाज, तत्काळ भरपाईसाठी करणार प्रयत्न.

यश सावर्डेकरचा पाउसकरांकडू सत्कार

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल यश सावर्डेकरचा सन्मान, सावर्डेचे आमदार तथा पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पाउसकर यांनी केला यशचा सत्कार.

हायकोर्टाच्या राज्य सरकारला कानपिचक्या

नगरपालिका निवडणुकीच्या आरक्षणात घटनात्मक तरतुदींना बगल, निवडणूक आयोगाची हायकोर्टासमोर कबुली, अधिसूचनेबाबत निर्णय घेण्यासाठी कोर्टाकडून सरकारला 24 तासांची मुदत.

आधी परेड, मगच लसीकरण…

आधी परेड, मगच लसीकरण, अग्निशामक दलाच्या जवानांना
वरिष्ठांकडून मिळाला आदेश.

30 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू

कोविड संसर्गामुळे धक्का बसून कळंगुटमधील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू, राज्यातील एकूण मृतांचा आकडा पोहोचला 788 वर.

नरेंद्र मोदींनी मानले गुजरातींचे आभार

गुजरातच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचा वरचष्मा, नरेंद्र मोदींनी मानले मतदारांचे आभार.

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे चिंता

देशभर वाढत्या कोरोना रूग्णांमुळे चिंता, पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठक, नव्या स्ट्रेनबाबत झाली चर्चा.

दिशा रवीला न्यायालयाकडून मोठा दिलासा

टूलकिट प्रकरणी दिशा रवीला न्यायालयाकडून मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर, शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात दिशी रवीला करण्यात आली होती अटक.

शेतकरी पाळणार पगडी संभाल दिन साजरा

कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन सुरूच, 23 ते 28 फेब्रुवारीदरम्यान पाळणार पगडी संभाल दिन, दमन विरोधी दिनाचंही आयोजन.

गुजरातमध्ये आपने केला शिरकाव

गुजरात महापालिका निवडणुकीत ‘आप’ची सूरतमध्ये एन्ट्री, तर ओवेसींच्या पक्षालाही यश; भाजप सुसाट, तर काँग्रेसला फटका.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी दोन आरोपी अटकेत

दिल्लीत 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारप्रकरणी दोन आरोपी अटकेत, मोहिंदरसिंग आणि मनदिपसिंगला पोलिसांकडून अटक, जम्मूमध्ये कारवाई.

राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

न्यायपालिका केंद्र सरकारच्या प्रभावाखाली, काँग्रेस खासदार राहुल गांधींचा हल्लाबोल, न्याय व्यवस्थेची कोंडी केल्याचा गंभीर आरोप.

जिनपिंग भारत दौर्‍यावर येणार?

सीमावाद आणि व्यापारी शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता, भारतात ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यास चीनचा पाठिंबा.

कर्नाटकात सहा जणांचा हकनाक बळी

जिलेटिनच्या स्फोटात कर्नाटकमधील चिक्काबल्लापूरमध्ये सहा जणांचा हकनाक बळी, उत्खननासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनची विल्हेवाट लावताना दुर्घटना.

आयुष्यातील सर्वांत मोठं गिफ्ट

भारताचा जलदगती गोलंदाज टी. नटराजननं इन्स्टाग्रामवर शेअर केला मुलीचा फोटो, आयुष्यातील सर्वांत मोठं आणि सुंदर गिफ्ट असल्याच्या भावना केल्या व्यक्त.

मेरी कोम पुन्हा उतरली रिंगमध्ये

भारताची विश्वविजेती बॉक्सिंग क्वीन मेरी कोमचं बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन, मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी सज्ज, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचं मेरीचं आवाहन.

सूर्यपुत्र कर्ण अवतरणार बॉलीवूडमध्ये

सूर्यपुत्र कर्ण अवतरणार बॉलीवूडमध्ये, लवकरच बिग बजेट चित्रपटाची घोषणा, निर्माता अभिनेता जॅकी भगनानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला लोगो.

बसमध्ये प्रियकराचा प्रेयसीवर चाकूहल्ला

मेक्सिकोतील सेनालिओमध्ये थरार, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये प्रियकराचा प्रेयसीवर चाकूहल्ला, सुदैवाने जाड जॅकेटमुळे मोठी इजा टळली, तरुणीवर उपचार सुरू.

सौदी अरेबियात महिलांना लष्करात एंट्री

कट्टर इस्लामिक राष्ट्र सौदी अरेबियात सामाजिक बदलाचे वारे, महिलांना लष्करात मिळणार संधी, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून आदेश जारी.

हेही वाचा – गोव्यातून सिंधुदुर्गात जाताय? कोरोना चाचणी करावी लागणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!