कळंगुट येथे 5 किलो गांजा जप्त

5 लाखांचा माल जप्त; 20 वर्षीय युवकाला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. बलात्कार, ड्रग्स, खून अशा गुन्ह्यांमध्ये गोवा राज्य हळुहळू यूपी, बिहार बनत चाललंय असंच वाटतंय. मुख्य म्हणजे या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये तरुण मुलांचा समावेश असलेला पहायला मिळतोय. त्यामुळे त्या दृष्टीनेदेखील चिंता व्यक्त केली जातेय. राज्यात रोज नवनवीन गुन्ह्यांच्या वार्ता समोर येत आहेत. त्यामुळे दिवसाढवळ्या घरातून बाहेर पडताना गोंयकार घाबरू लागलेत. शुक्रवारी कळंगुट येथे पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करत कारवाई केलीये.

हेही वाचाः चंद्रकांत बांदेकर खून प्रकरण: संशयित जयपुरी गोस्वामी याला अटक

कळंगुट येथे गांजा जप्त

पोलिसांच्या गुन्हा शाखेने बागा कळंगुट येथे गांजा जप्त करत कारवाई केली आहे. या प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आलीये. संशयिताचं नाव अवजित जना (वय वर्षं, २०) असं आहे. हा तरुण मूळ ओडिसा येथील रहिवासी आहे.

5 लाखांचा माल जप्त

या कारवाईत गुन्हे शाखेने संशयित तरुणाकडून ५ लाखांचा माल जप्त केला आहे. म्हणजे ५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असल्याचं समजतंय. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालीये.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Breaking | Siddhi Naik Death Case | Crime | सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!