48% #Positivity_Rate सह गोवा देशात पहिला, दुसऱ्या नंबरचं राज्य गोव्याच्या आसपासही नाही!

छोट्या राज्याची ही स्थिती तर मोठ्या राज्यांचं काय?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना रुग्णवाढीची चिंता गोव्याची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरु लागली आहे. अनेक रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये जरी असले, तर वाढता मृतांचा आकडाही आरोग्य यंत्रणेची पोलखोल करतोय. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार गोवा हे पॉझिटिव्हिटीमध्ये नंबर एकला असलेलं राज्य बनलंय. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात घनता जास्त असूनही पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक असणं, ही धोक्याची घंटा मानली जाते आहे.

मोठ्या राज्यांचं काय?

गोव्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ४८ टक्के इतका आहे. याचाच अर्थ गोव्यात टेस्ट केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची शक्यता ४८ टक्के इतकी जास्त आहे. जर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ही स्थिती आहे, तर मोठ्या राज्यांमध्येही चिंताजनक स्थिती असेल, असा अंदाज लावला जाऊ शकतो. मात्र तसा अंदाज लावणं हे चुकीचं ठरेल. कारण महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, उत्तराखंड मधील पॉझिटिव्ह रेट हा गोव्याच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. दरम्यान, जी आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं दिली आहे, त्यात उत्तर प्रदेश, बिहार यांचा उल्लेख आढळून आलेला नाही. त्यामुळे या राज्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटवरुन सवाल उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, गोव्याचा जो पॉझिटिव्हि रेट आहे, त्याच्या आसपासही देशातील इतर कोणतंही राज्य नाही. म्हणजे गोवा नंबर एकला आहे, तर दुसऱ्या क्रमांकवर पॉझिटिव्हिटी रेटमध्ये हरियाणा आहे. मात्र या दोन्ही राज्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्येही तब्बल ११ टक्क्यांचा फरक आहे. यावरुन गोव्यातील स्थिती किती चिंताजनक आहे, इतर राज्यांच्या तुलनेत, याची कल्पना करता येऊ शकेल.

यूपी, बिहार नियंत्रणात?

१५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारी एकूण देशात २४ राज्य आहेत. तर ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट असणारी एकूण १० राज्य आहेत. तर ५ टक्क्यापेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणारी एकूण ३ राज्य आहेत. ज्याअर्धी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा उल्लेख केलेला नाही, त्याचा अर्थ तिथला पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांपेक्षा कमी असणार, असं गृहित धरलं जाऊ शकतं. मात्र एकूणच मोठ्या राज्यांच्या तुलनेत देशातील छोटी राज्य ही कोरोनाच्या आताच्या लाटे सर्वाधिक प्रभावित झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

सध्याची गोव्याची स्थिती काय? (5 मे पर्यंत)

रिकव्हरी रेट – ७१.८३ टक्के
आतापर्यंत किती बरे झाले? – 74 हजार ९९१
सक्रिय रुग्णसंख्या – २७ हजार ९६४
एकूण मृत्यू – १ हजार ४४३
एकूण बाधित – १ लाख ४ हजार ३९८

हीच आकडेवारी टक्क्यांमध्ये पाहूयात, १५ लाख लोकसंख्या मानून…

१.८६ टक्के सध्या एक्टीव
६.९ टक्के लोकांना लागण
०.९६ टक्के लोकांचा मृत्यू
एकूण लोकसंख्येच्या ४.९ लोक बरे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!