जीएसटी काऊन्सिलची 43वी बैठक संपन्न

व्हर्च्युअल माध्यमातून मंत्री गुदिन्होंची उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जीएसटी परिषदेची 43 वी बैठक पार पडली. जवळपास आठ महिन्यानंतर झालेल्या या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. व्हर्च्युअल माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत मंत्री मॉविन गुदिन्होंनी गोव्याचं प्रतिनिधीत्व केलं.

मॉविन गुदिन्होंनी केली मागणी

या बैठकीत मंत्री मॉविन गुदिन्होंनी विविध मागण्या अर्थमंत्र्यांसमोर ठेवल्या. जीएसटी परताव्याच्या निकषांतून गोव्याला दिसासा देण्याची मागणी गुदिन्होंनी यावेळी केली. तसंच केंद्रानं गोव्याला अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. गुदिन्होंनी यावेळी खाणबंदीचा विषय जीएसटी मंडळासमोर मांडला. तसंच कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर आलेल्या बंदने गोव्याची कशी आर्थिक कोंडी केली आहे, हे गुदिन्होंनी यावेळी बैठकीत सांगितलं.

हेही वाचाः खासगी बस व्यावसायिकांची आर्थिक स्थिती बिकट

केंद्राकडून गोव्याला मिळणार 840 कोटी रुपये!

या बैठकीत केंद्राकडून अधिक निधी मिळवण्यासाठी गुदिन्होंनी प्रयत्न केला. याचे फलस्वरुप केंद्राने जीएसटीपोटी गोव्याला 840 कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलं. तर टॅक्सींना मीटर बसवण्याबद्दल सांगितलं.

हेही वाचाः दिलासादायक! बऱ्याच दिवसांनंतर रुग्णवाढ १ हजाराच्या आत

तमिळनाडूच्या अर्थमंत्र्याकडून गोव्याचा अपमान!

या बैठकीदरम्यान तमिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी गोव्याचा उपमर्द केला. त्यांना गुदिन्होंनी या बैठकीत सडेतोड उत्तर देत माफी मागण्याची मागणी केली.

हेही वाचाः बिबट्याच्या बंदोबस्तासाठी खास पथक तैनात

जीएसटीमध्ये कोविड उपकरणांवर त्वरित सवलत

कोरोना मेडिसिन आणि उपकरणांवरील जीएसटीमधील कपात करण्याबाबत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या विषयांवर गंभीर चर्चा झालीय. बर्‍याच बाबींवर चर्चा झालीय. जीएसटी कौन्सिलने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कोरोना उपकरणांच्या आयातीवरील जीएसटीला सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. जीएसटीमध्ये त्वरित सवलत कोविड उपकरणावर देण्यात आलीय. करात सूट देण्यासाठी मंत्रालयांचा एक गट तयार करण्यात आलाय. इतर कोणत्याही उपकरणांवर कर कमी करायचा की नाही, याबाबत 8 जूनपूर्वी अंतिम निर्णय घेण्यात येईल. काळ्या बुरशीची वाढती प्रकरणं लक्षात घेऊन सरकारने अ‍ॅम्फोटेरिसिन बीला (Amphotericin B) जीएसटीमधून सूट देण्याच्या प्रकारात समाविष्ट केलेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!