करोनातून बरे झालेल्या ४१ नागरिकांचा मृत्यू

आतापर्यंत १,०१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: आरोग्य खाते तसंच इतर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या १,०१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर, करोनातून बरे झाल्यानंतरही (पोस्ट कोविड) राज्यातील ४१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.

हेही वाचाः ट्यूशन, जिमखाना, कल्चरल शुल्क 50 टक्के माफ

आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा कवच

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्यासह अन्य तीन विरोधी आमदारांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न विचारला होता. करोनाचा राज्यात प्रवेश झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य खात्यांतर्गत सेवा बजावणाऱ्या ८८५, गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलातील (गोमेकॉ) ३४ आणि मानसोपचार इन्स्टिट्यूटमधील (आयपीएचबी) ९६ अशा एकूण १,०१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यातील बहुतांशी जण करोनामुक्त होऊन कामावर रुजू झाले आहेत. करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा कवच देण्यात आले आहे, असं मंत्र्यांनी उत्तरात म्हटलं आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यातील कोविड परिस्थिती ‘जैसे थे’

करोनातून मुक्त झालेल्या ४१ नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू

मे २०२१ मध्ये गाेमेकॉत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंची चौकशी सुरू आहे का, किंवा सुरू असल्यास त्यासंदर्भातील तपशील सादर करण्याची मागणी आमदारांनी केली होती. त्यावर मंत्र्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे. दरम्यान, करोनातून मुक्त झालेल्या ४१ नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं सांगत त्यांचे पत्ते आणि मृत्यूची कारणंही उत्तरातून दिली आहेत.

हेही वाचाः ‘या’ राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू

हॉस्पिसियोतील सर्वाधिक कर्मचारी बाधित

– मडगाव येथील हॉस्पिसियो हॉस्पिटलात आतापर्यंत सर्वाधिक १४९ आरोग्य कर्मचारी बाधित सापडले. त्यानंतर पणजीतील नागरी आरोग्य केंद्रात १३६, ईएसआय हॉस्पिटल मडगाव येथे ६७, चिखली हॉस्पिटलात ६५, तर फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटलात ४४ आरोग्य कर्मचारी बाधित झाले.
– पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १७, म्हापशात ३०, वास्कोत २३, चिंबलमध्ये ४, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात १५, कासारवर्णेत ७, धारबांदोड्यात ८, कुठ्ठाळीत ६, शिवोलीत ८, काणकोणमध्ये १२, कुडचडेत २५, पेडणेत १२, वाळपईत २८, डिचोलीत ११, कांदोळीत १६, कोलवाळ येथे ५, खोर्लीत १८, साखळीत ४०, मयेत ४, बाळ्ळीत ३, कासावलीत १०, चिंचणीत ६, कुडतरीत २२, लोटलीत ४, मडकईत ६, केपेत ३, सांगेत ३, शिरोड्यात ९, फोंड्यात १०, नावेलीत ८, यूएचसी मडगाव येथे ८, एनसीडीसी कांपाल येथील २, गोवा एड्स कंट्राेल सोसायटीतील १७, ईएसआय पणजीतील २, ईएसआय डिस्पेन्सरी म्हापसा येथील ३, डीएचएस-कांपाल येथील १४ कर्मचारी बाधित झाले.
– ईएसआय डिस्पेन्सरी मडगाव, ईएसआय डिस्पेन्सरी कुंडई, ईएसआय डिस्पेन्सरी कुडचडे, प्राथमिक आरोग्य केंद्र हळदोणे आणि बेतकी येथील प्रत्येकी एका आरोग्य कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली.

हेही वाचाः महाराष्ट्रातील 56 हजार कलाकारांना 28 कोटींची मदत

२० टक्के वेतनवाढीस तत्त्वतः मंजुरी

कोविडसाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आश्वासनानुसार २० टक्के वेतनवाढ दिली आहे का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने या कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतनवाढ देण्याचे तत्त्वतः मंजूर केले असून, त्यासंदर्भातील अहवाल आरोग्य खात्याकडून मागविण्यात आला आहे, असे नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचाः सिंधुदुर्ग-गोवा प्रवेशाबाबत 2 दिवसांत निर्णय

आगामी सणांसाठी लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे : सावंत

राज्यात सध्या कोविड संसर्गाचा वेग १.८ ते २ टक्क्यांवर आहे. संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला असून परराज्यांतून येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल, बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | BHUMI ADHIKARINI | भूमी अधिकारिणीचं नाव बदलून चालणार नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!