शिवोलीत ४.३० लाखांचे ड्रग्स जप्त

४.३ किलो गांजा जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

शिवोली: देश-विदेशांत पर्यटनासाठी प्रसिद्ध गोवा राज्य अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलं आहे. दरदिवशी नवनवीन अमलीपदार्थविरोधी कारवाईची प्रकरणं उजेडात येत आहेत. काही वर्षांपूर्वी राज्यातील समुद्रकिनारी भागापुरता मर्यादित असलेला अमली पदार्थांचा व्यवसाय आता गावागावांत पोहोचला असून राज्यातील युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडू लागली आहे. शुक्रवारी पहाटे शिवोलीत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केलेत.

हेही वाचाः ROBBERY | फोंड्यात दोघा चोरट्यांना अटक

शुक्रवारी पहाटे केली कारवाई

अमलीपदार्थ विरोधी पथकाने शिवोली येथे शुक्रवारी पहाटे केलेल्या कारवाईत ४.३० लाख रुपये किंमतीचा ४.३ किलो गांजा जप्त केला. यावेळी मुंबई येथील रहिवासी फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. संशयित शेख याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचाः ROBBERY | घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी

राज्यात सध्या पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे या पर्यटकांना अमली पदार्थ पुरवठा करण्याच्या हेतूने शेख यांनी हा गांजा बाळगलेला का? यात त्याचा आणखीनही कुणी साथीदार गुंतला आहे का? याचा तपास सध्या पोलिस घेत असून संशयिताची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

हेही वाचाः पुरामुळे फोंडा तालुक्यात ४२६ घरांची हानी

गोवा राज्य ड्रग्सच्या विळख्यात

गोव्यातील किनारी भागात अमली पदार्थांचा व्यवहार सुरू मोठ्या संख्येने सुरू आहे. किनारी भागातील हॉटेल्स आणि संगीत पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचं सेवन केलं जातंय. आता राज्यभरात अमली पदार्थांचा व्यवहार फोफावत चाललाय. दरदिवशी वर्तमानपत्रांतून अमली पदार्थ विकणार्‍यांना अटक केल्याच्या बातम्या वाचायला मिळतायत. अमली पदार्थाच्या व्यवहाराने आता संपूर्ण गोव्यालाच विळख्यात घेतलं आहे. गावागावांत अमलीपदार्थांची विक्री होऊ लागली आहे. शैक्षणिक संस्थांच्या आसपाससुद्धा अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार घडू लागले आहेत, अशा तक्रारी वाढत आहेत. अमली पदार्थांचा व्यवहार करणार्‍या माफियांकडून युवा पिढीला लक्ष्य बनवलं जात आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | LABOURS | COVID | परप्रांतीय मजुरांची पत्रादेवीत गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!