अग्निशामक दलातील रद्द झालेली ३०३ पदं भरणार

गृह खात्याचे अवर सचिव प्रितीदास गावकर यांनी जारी केली अधिसूचना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी:  अग्निशामक दलातील काही कारण्यामुळे रद्द झालेल्या ३०३ पदे पुनरुज्जीवीत करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना गृह खात्याचे अवर सचिव प्रितीदास गावकर यांनी जारी केली आहे.

हेही वाचाः व्यावसायिकाची 6.77 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

गृह खात्याने जारी करण्यात आलेल्या अधिसुचनानुसार, अग्निशामक दलात ए श्रेणीतील 2 पदे, बी श्रेणीतील 3 पदे, तर २९८ पदे सी श्रेणीतील मिळून ३०३ पदाचा समावेश आहे. यात विभागीय अधिकारीचे दोन पदे (ए श्रेणी), सहाय्यक विभागीय अधिकारी तीन पदे (बी श्रेणी) आहेत.

तर खालील सर्व पदे सी श्रेणीतील असून त्यात स्टेशन फायर आफिसर १ पद, उप अधिकारी १२ पदे, लिडिग फायर फायटर ३३ पदे, चालक आपरेटर ४२ पदे, वॅटच रुम आपरेटर ९ , फायर फायटर १८५ पदे, वरिष्ठ स्टेनोग्राफर एक पद, अव्वल कारकून एक पद आणि कनिष्ट कारकून १४ पदे मिळून ३०३ पदे पुनरुज्जीवीत करण्यात आली आहेत.

हा व्हि़डिओ पहाः VIDEO | Rain | Yellow Alert | येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!