‘स्वयंपूर्ण गोंय’अंतर्गत ३०० लोक आत्मनिर्भर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी अस्नोडा पंचायतीमध्ये आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा अभियानांतर्गत सुमारे ३००  लोक आत्मनिर्भर झाले असल्याचं सांगितलं. स्वयंपूर्ण मित्रांनी स्थानिकांना प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करण्यास चांगला पुढाकार घेतल्यानं हे शक्य झाल्याचं ते म्हणालेत. गोवा मुक्तीची 60 वर्षं साजरी करताना गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आपण योगदान देण्याची गरज आहे. आम्हाला समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि आमचं सरकार जात, धर्म आणि पंथ बाजुला सारून अंत्योदय तत्त्वावर कार्य करतं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः चतुर्थीआधी टॅक्सीच्या मीटरचा प्रश्न निकाली निघणार? लोबो म्हणतात की…

लोकांना सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देणं स्वयंपूर्ण मित्रांचं कर्तव्य

अस्नोडा बस स्टँड येथे म्हापसा रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्णा गोवा अंतर्गत मेगा आरोग्य आणि वैद्यकीय उपकरणं प्रदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. रोटरी क्लब ऑफ म्हापसा, इनर व्हील क्लब ऑफ म्हापसा आणि स्वयंपूर्णा मित्रा आणि ईशा सावंत यांची अस्नोडा ग्रामपंचायत स्वयंपूर्ण बनविण्याच्या दिशेने पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांची प्रशंसा केली. त्यांनी आपण अनेक योजनांचा शुभारंभ केल्याचं सांगितलं आणि सरकारी योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणं आणि लोकांना सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणं हे पंचायत सदस्य आणि लोकांचं पहिलं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले.

स्वयंपूर्ण मित्राची नेमणूक करण्यासाठी सरकारची कल्पना एक निर्णायक पाऊल

आमदार श्री निळकंठ हळर्णकर यांनी आपल्या भाषणात स्वयंपूर्ण मित्राची नेमणूक करण्यासाठी सरकारची कल्पना ही स्वयंपूर्ण मिशन अंतर्गत गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक निर्णायक पाऊल असल्याचं सांगितलं. त्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि गोव्यातील तौक्ते चक्रीवादळाच्या गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं.

हेही वाचाः जलस्त्रोत खात्याचे रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच

या कार्यक्रमाला स्वयंपूर्ण मित्र ईशा सावंत, रोटरी क्लब ऑफ म्हापसाचे अध्यक्ष सिद्धेश कोटकर, इनर व्हील क्लब ऑफ म्हापसाच्या अध्यक्ष राजवी महाबल, हरूण इब्राहिम, सपना मापारी आणि सर्व पंच सदस्य उपस्थित होते.ममेगा हेल्थ अँड मेडिकल इक्विपमेंट डोनेशन कॅम्पमध्ये शुगर तपासणी, अझिलो तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी केली आणि मोतीबिंदू आढळलेल्या सर्वांना मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची सोय केली जाईल. शिबिरामध्ये श्री क्लिनिकल लॅब्स, म्हापसा यांनी ब्लड श्यूगर तपासणी केली. मुक्ता ऑप्टिशियन्सने गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे दिले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीद्वारे म्हापसा येथे रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचाः अखेर शेरीफ जॅकीस यांनी दिला वेर्णा पोलीस स्थानकाचा ताबा

रोटरी क्लब म्हापसा इलिट अँड इनर व्हील क्लब ऑफ म्हापसाने गरजू लोकांसाठी व्हीलचेअर, दृष्टीहिनाना स्टिक, वॉकर आणि वॉकिंग स्टिक्स यासारख्या वस्तू दान केल्या आहेत. त्याचप्रमाणे, इनर व्हील क्लब म्हापसा यांनी महिला स्वयंसहाय्य गटांना आट्टा चक्की मशीन दान केले आणि अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग मशीन लॉज हेग ब्राउन ३८२९ ईसीने स्वयंसहाय्य गटांना दान केले, ज्यामुळे स्वयंसहाय्य गटांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत होईल. या शिबिरामुळे लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) साठी नोंदणी करण्याची सुविधा मिळेल.

ईशा सावंत यांनी स्वागत केलं, तर सिद्धेश कोटकर यांनी आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!