100 नव्हे, गोव्याला 300 कोटींचं पॅकेज

गोवा राज्यासाठी हा अर्थसंकल्प खास ठरला आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोवा राज्यासाठीही हा अर्थसंकल्प खास ठरला आहे.

गोव्याला 300 कोटींच पॅकेज

गोवा सरकार यंदा गोवा मुक्तीचं हिरक महोत्सवी वर्षं साजर करतं आहे. यासाठी गोवा सरकारनं केंद्राकडे 100 कोटींच्या आर्थीक पॅकेजची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत गोव्यासाठी 300 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केलीय. गोवा सरकार यंदा गोव्याच्या मुक्तीची 60 वर्षं साजरी करत आहे. या वर्षांत अनेक वेगवेगळे कार्यक्रम सरकार राबवणार आहे. गोव्याबाहेरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

केंद्र सरकारनं 300 कोटींच्या पॅकेज जाहीर केल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आभार मानलेत. गोव्याच्या मुक्तीची 60 वर्षं साजरी करत असताना केंद्र सरकारनं जाहीर केलेलं 300 कोटींचं पॅकेज हा मोठा दिलासा देणारी गोष्ट ठरली असल्याचं डॉ. प्रमोद सावंत ‘गोवन वार्ता’शी बोलताना म्हणाले. या आर्थीक पॅकेजचा उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!