कळंगुटमध्ये ३ किलो १५० ग्रॅम गांजा केला हस्तगत…

संशयित गांती मध्याप गणेश या युवकास अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : कळंगुट पोलिसांनी ड्रग्जविरोधी कारवाईखाली नायकावाडा येथे छापा टाकून संशयित गांती मध्याप गणेश (२४, ओडिशा) या युवकास अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ३.१५ लाखांचा ३ किलो १५० ग्रॅम गांजा हस्तगत केला.
हेही वाचाःकोलवाळमध्ये १.८२ किलो ग्रॅम गांजा जप्त…

विश्वसनीय सूत्रांनी पोलीसांना दिली संशयितांची माहिती

ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली. नायकावाडा-कळंगुट येथील आना लुसिंदा या व्हिला जवळ ड्रग्जचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला. संशयित आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्याला पकडले व त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या जवळील बॅगमध्ये वरील ड्रग्ज सापडला. या ड्रग्जची किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे.
हेही वाचाः Land Grabbing Case | ज‌मिनी हडपप्रकरणी राजकुमार मैथीला तिसऱ्यांदा ‘अटक’…

पोलीस निरीक्षकांनी केली कारवाई

पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर रामानन, उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार विद्यानंद आमोणकर, अमीर गरड, विजय नाईक, आकाश नाईक व गणपत तिळोजी या पथकाने केली.
हेही वाचाःतब्बल १८ दिवसांनी सापडला पर्यटकाचा मृतदेह…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!