TIKA UTSAV | म्हापशात तीन दिवसीय टीका उत्सव

1200 जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट्य; आमदार जोशुआ डिसोझा यांची माहिती

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः भाजपतर्फे 45 वयोगटावरील लोकांसाठी तीन दिवसीय टीका उत्सवाला म्हापशात सुरुवात झाली आहे. या मोहिमेत जवळपास 1200 जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आलंय. ही मोहिम रविवार 30 मे पर्यंत चालू राहिल, अशी माहिती आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. खोर्लीतील सारस्वत विद्यालय तसंच जुन्या आझिलो हॉस्पिटलमध्ये या टीका उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाला म्हापसा नागरी आरोग्य केंद्राचं सहकार्य लाभलंय.

हेही वाचाः प्रजासत्ताक कोरियाने भारताला पाठवली वैद्यकीय मदत

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मंडळाध्यक्ष नगरसेवक सुशांत हरमलकर, सारस्वत शिक्षण संस्थेचे रामनाथ बुर्ये, तसंच नगरसेविका डॉ. केल ब्रांगाझा, नगरसेवक साईनाथ राऊळ, स्वप्नील शिरोडकर, माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, माजी नगरसेवक राजसिंह राणे, मंडळाचे सरचिटणीस यशवंत गवंडळकर, योगेश खेडेकर तसंच इतर उपस्थित होते.

हेही वाचाः मोरजीतील कुडाळकर, कार्दोज कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार

ही मोहीम यशस्वी करावी

पक्षाने पालिका तसंच पंचायत क्षेत्रात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हापशात तीन दिवसीय उपक्रम सुरू आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांना लसीकरणासाठी पुढे आणावं तसंच ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन आमदार डिसोझा यांनी केलंय.

हेही वाचाः DRDO ने बनवलेल्या 2DG औषधाची किंमत ठरली

संकोच न बाळगता लस टोचून घ्या

टीका उत्सवात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. करोना लसीकरणाविषयी लोकांनी संकोच न बाळगता ही लस टोचून घ्यावी, असं आवाहन नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी केलंय.

हेही वाचाः राज्याचा कोविड पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कोरोना योध्यांचा सन्मान

‘सेवा ही संघटना’ या कार्यक्रमांतर्गत पक्ष हा टीका उत्सव करत आहे. शनिवारी म्हापसा अर्बन बँकेजवळ सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं जाईल. तसंच रविवारी संपूर्ण बाजारपेठ परिसराचं निर्जंतूकीकरण केलं जाईल. खोर्लीतील केंद्रात करोना योध्यांचा सन्मान करण्यात येईल. यात पालिका कर्मचारी, अग्नीशमन दल, वीज कर्मचारी यांचा समावेश असेल, असे  मंडळाचे अध्यक्ष सुशांत हरमलकरांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!