मांद्रे मतदारसंघात 2700 झाडे लावणार : दीपक कळंगुटकर

ध्रुव स्पोर्टस-कल्चरल क्लबतर्फे वनमहोत्सव साजरा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : आम्हाला मोफत ऑक्सिजन देणा-या झाडांचं महत्व सर्वांनाच कळून चुकलंय. त्याच भूमिकेतुन गतवर्षी ध्रुव क्लबनं 15 झाडं लावली होती. यावर्षी संपुर्ण मांद्रे मतदार संघात 2700 झाडे लावणार असल्याची माहिती ध्रुव स्पोर्टस-कल्चरल क्लबचे चेअरमन तथा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी दिली. संस्थेतर्फे २०२१ वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

पार्से व तुये येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेखर पार्सेकर, निलेश कळंगुटकर, माजी सरपंच गोपाळ भिसाजी, सिद्धेश नाईक, अनिकेत केरकर, श्रीराम साळगावकर, राम नागवेकर, गंगाराम नाईक, त्रिवेणी सावंत, उलीन्दा फर्नांडिस, सितारा मांद्रेकर, विषया कांबळी, अनिता कलंगुटकर, साईली कांबळी, अमिषा शेटगावकर, दिशा कांबळी, गोकुळदास गवंडी, धीरज हडफडकर, राहुल बांदेकर आदी उपस्थित होते.

कळंगुटकर म्हणाले, जंगल तोड व किनारी भागातही झाडे तोडून सिमेंटची जंगले उभारली जातात, हे पर्यावरणाला घातक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून आम्ही आपला परिसर हरित. झाडे आम्हाला प्राणवायू देतात आणि मानवाला जो हानीकारक वायु आहे तो ही झाडे शोषून घेतात.

आपण आपल्या मुलावर संस्कार करीत असतो, तसे संस्कार लावलेल्या झाडावर करून त्याला मायेचे खतपाणी घालून वाढवा. मोठेपणी आपल्याला ती झाडे चवदार फळे देतील, असं सांगून ते म्हणाले, एक झाड कापले तर त्याठिकाणी दोन झाडे लावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रतिज्ञा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गतवर्षी ध्रुव क्लबने १५०० झाडे लावली होती. यावर्षी २७०० झाडांची लागवड करणार आहे. पूर्ण मांद्रे मतदार संघात ही झाडे लावली जाणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!