ACCIDENT | साकवाळ येथील अपघातात एकाचा मृत्यू

26 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बुधवारी झाला अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः राज्यात अपघातांच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये. रोज अपघातांच्या बातम्या कानावर येत आहेत. अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्याही वाढतेय. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. बुधवारी येथील साकवाळ भागात असाच एक भीषण अपघात झालाय. एक अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय.

हेही वाचाः काय चाललंय काय? केपेत आसाममधील तरुणीवर बलात्कारानं खळबळ

कुणाचा अपघात?

बुधवारी साकवाळ येेथे झालेल्या भीषण अपघातात एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तरुणाचं नाव विजय पटेल असल्याची माहिती मिळतेय. मृत व्यक्ती ही साकवाळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. वेर्णा पीएसआय श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) येथील कॅज्युअल्टी पोलिसांकडून वायरलेस संदेश मिळाला की साकवाळ येथील विजय पटेल याला वाहन अपघात झाला असून त्याला जीएमसीतील वॉर्ड क्रमांक १०८ मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचाः बीएसएनएल कमर्चाऱ्यांची तार नदीत आत्महत्या

कसा झाला अपघात?

पोलिसांना चौकशीदरम्यान असं आढळून आलं की मृत व्यक्ती त्याच्या होंडा ग्राझिया स्कूटरवरून ( सीजी०४-एमबी-३८४३) बिर्ला क्रॉस जंक्शनहून क्वीनी जंक्शनच्या दिशेने वेगाने जात होता आणि जेव्हा तो साकवाळ येथील कला भवनजवळ पोहोचला, तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो स्कूटरसह गटारात पडला. पडल्यानंतर त्याला गंभीर शारीरिक दुखापत झाली. मृत विजय हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

हेही वाचाः जीवावरचं शेतीवर निभावलं !

उपचारादरम्यान जीएमसीत मृत्यू

अपघात झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेने त्याला बांबोळीतील जीएमसी येथे नेण्यात आलं. जिथे वॉर्ड क्रमांक 108 मध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पीएसआय कामत यांच्याकडून सांगण्यात आलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | पावसाळी अधिवेशन | बलात्कारप्रकरणावर सभागृहात वादळी चर्चाताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!