राज्यात 24 तासांत 24 जणांनी गमावला जीव

सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 18 हजार 829 वर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात गेल्या 24 तासांत 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 12 रुग्णांचा दक्षिण जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, तर 11 रुग्णांचा बांबोळीच्या गोमेकॉत मृत्यू झाला. एका रुग्णाचा दक्षिण गोव्यात खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 18 हजार 829 वर पोहोचली आहे.

लस घेतलेल्या चौघांचा मृत्यू

कोविडमुळे मृत झालेल्या 24 जणांमध्ये कोविडची पहिली लस घेतलेल्या चौघांचा समावेश आहे. कोविड लस घेऊनही कोरोना संसर्ग होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नोंदवली गेली. 24 तासांत तब्बल 3 हजार 101 नवे रुग्ण आढळले. गेल्या 24 तासांत 8 हजार 57 चाचण्या झाल्या. त्यातील 4 हजार 917 चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. 2 हजार 286 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या एकूण चाचण्यांपैकी 3 हजार 101 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.

कुठ्ठाळीत सर्वाधिक 299 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पणजीत 233, मडगावमध्ये 222, पर्वरीत 187, फोंड्यात 157, कांदोळीत 139, म्हापशात 130, तर डिचोलीत 129 रुग्ण आढळले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!