केंद्र सरकारला गोवा शिपयार्ड लिमिटेड कडून 22.30 कोटी

आर्थिक वर्ष 20-21 साठी अंतरिम लाभांश प्रदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा शिपयार्ड लिमिटेडने आर्थिक वर्ष 20-21 साठी केंद्र सरकारला 22.30 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांशाचा धनादेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे 3 मार्च 2021 रोजी सुपूर्द केला. गोवा शिपयार्ड लिमिटेडच्यावतीने कमांडर बी. बी. नागपाल आयएन (निवृत्त) सीएमडी जीएसएल यांनी हा धनादेश सिंह यांना सुपूर्द केला. संरक्षण उत्पादन सचिव, राज कुमार आणि अतिरिक्त सचिव संजय जाजू देखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचाः देशात पणजी शहर राहणीमानात अव्वल!

भागधारकांना लाभांश जानेवारी 2021 मध्ये वितरित

कंपनीच्या संचालक मंडळाने 17 डिसेंबर 2020 रोजी पाच रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी 3.75 रुपये इतका अंतरिम लाभांश जाहीर केला जो कंपनीच्या रोख भागभांडवलाच्या 75% इतका आहे. भागधारकांना हा लाभांश जानेवारी 2021 मध्ये यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! पालिका आरक्षावरुन दिलेल्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी बी नागपाल म्हणाले…

आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड कठोर परिश्रम करीत आहे. या कामगिरीबद्दल गोवा शिपयार्ड आमचे ग्राहकांचे आणि सरकारचे आभारी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!