गोव्यात ४० पदांसाठी २० हजार अर्ज, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

१४,४११ उमेदवार चाचणीसाठी पात्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : चारशे पदांसाठी तीस हजार अर्ज येतात, हे समजण्यासारखे आहे. पण, फक्त चाळीस पदांसाठी २० हजार अर्ज येतात आणि त्यातील १४,४११ जण ओएमआर चाचणीसाठी पात्र ठरतात, यावरून सरकारी नोकरीमागे धावणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे, हे लक्षात येते.
हेही वाचाःराज्यातील १७ उपअधीक्षकांसह ३२ जणांच्या बदल्या…

उच्च शिक्षण खात्याने फक्त ४० पदांसाठी अर्ज मागवले होते

गोवा उच्च शिक्षण खात्याने अव्वल कारकुनांची ४० पदे भरण्यासाठी जाहिरात केली होती. त्या जाहिरातीनंतर सुमारे २० हजार उमेदवारांचे अर्ज आले. त्यातील ५,१७६ जणांना ओएमआर चाचणीसाठी अपात्र ठरवले गेले. तर १४,४११ जण परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिली वेळ नाही, पण उच्च शिक्षण खात्याने फक्त ४० पदांसाठी अर्ज मागवले होते. इतक्या कमी पदांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गोमेकॉत सुमारे दोन हजार पदे भरण्यासाठी जाहिरात केली होती त्या पदांसाठी सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते.
हेही वाचाःशिवोलीतील डॉम्निक डिसोझाला अटक, ‘हे’ आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!