वास्को पालिका निवडणुकीत विरोधात लढलेल्या 20 जणांचा भाजपात प्रवेश

वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेडा यांनी दाखवली ताकद

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजी : वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेडा यांनी वास्को मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्यात आपला प्रभाव दाखवण्यास यश मिळवले. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांविरोधात लढलेल्या 20 प्रतिस्पर्ध्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले.
वास्को मतदारसंघातील विविध प्रभागांतील 20 उमेदवारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना आल्मेडा म्हणाले की, भाजपात प्रवेश केलेल्या सर्व 20 उमेदवारांची आपापल्या भागात मोठी ताकद आहे. त्यांच्या मागे जनमत आहे. त्यांच्या विनंतीनुसार ते पक्षात सामील झाले आहेत. मी त्यांना मतभेद मिटवण्याची विनंती केली होती. त्यांनी पक्षाला बळकट करण्याच्या उद्देशाने आमच्या विनंतीला मान दिला. त्यापैकी काही माझे चांगले आणि जुने मित्र देखील आहेत.

ते पुढं म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी ही पक्षाच्या संसदीय मंडळाद्वारेच निश्चित केली जातील परंतु सध्याचा कल हा आहे की, विद्यमान आमदाराला नेहमीच तिकीट दिले जाते. मी सध्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या शेजारी बसलो आहे आणि दिवसभर आम्ही संपूर्ण मतदारसंघात यशस्वी दौरा केला आहे. वास्को मतदारसंघासाठी भाजपच्या तिकिटावर दावा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अफवा टाळण्यासाठी हे पुरेसे आहे, असे आल्मेडा म्हणाले.

सदानंद शेट तानावडे म्हणाले की, तिकीट वाटपासाठी प्रक्रिया आहे, अगदी मुख्यमंत्र्यांसाठी सुध्दा त्यांच्या मतदारसंघात एकच नियम लागु होतो. मी असे म्हणू शकतो की, पक्षाध्यक्ष म्हणून आम्ही वास्कोच्या भाजप पक्षाच्या तिकिटासंदर्भात कोणालाही शब्द दिलेला नाही. या कार्यक्रमादरम्यान आल्मेडा दिवसभर माझ्याबरोबर होते. पक्षाने उमेदवार जाहीर करेपर्यंत कोणीही अफवांना बळी पडू नये. पक्षाच्या तिकिटाचा दावा करणारी व्यक्ती दौऱ्यादरम्यान माझ्याबरोबर असती तर परिस्थिती वेगळी असती, असे ते नाव न घेता म्हणाले.

या दौऱ्यात पायलट, रिक्षा आणि टॅक्सी संघटना, मंदिर समित्या, चर्चचे पुजारी, माजी सैनिक, गुजराती आणि केरळ अशा विविध संघटनांना भाजपानं भेट दिली. वेगवेगळ्या प्रभागांमध्ये बैठका घेतल्या आणि विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला.
केकवरील आयसिंग म्हणजे नागरी निवडणुकीत भाजप उमेदवारांविरोधात लढलेल्या उमेदवारांचा समावेश होता. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वास्कोमध्ये पक्ष अधिक बळकट होईल असे तानावडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!