भ्रष्टाचार प्रकरणी चार वर्षांत २० जणांना निलंबित

आमदार फेरेरा यांच्या अतारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

णजी : भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) चार गुन्ह्यांत सहा जणांना अटक केली होती. त्या सर्वांची नंतर न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

२०१८ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत २० जणांना निलंबित

या शिवाय २०१८ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत २० जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यातील एकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री तथा दक्षता खात्याचे मंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याविषयी विधानसभेत अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता.

हेही वाचाः FINANCE VARTA | एसआयपीने नवीन विक्रम निर्माण केला, इक्विटी फंडातील आवक डिसेंबरमध्ये 3 पटीने वाढली

जामिनावर सुटका

लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली एसीबीने एका सरपंचाला, तीन पंच सदस्यांना, एक तलाठी आणि कनिष्ठ अभियंत्याला अटक केली होती. त्यानंतर त्या सर्वांना न्यायालयाने जामिनावर सुटका केली. याशिवाय २० सरकारी अधिकाऱ्यांना दक्षता खात्याने निलंबित केले होते. त्यातील एका अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तर एकाला सक्तीने निवृत्त करण्यात आले. याशिवाय दोघे निवृत्त झाले. तर १२ अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले असून सद्यःस्थितीत चार अधिकारी निलंबित असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!