राज्यातील दोन्ही जिल्ह्यांत २० नवे हॉटस्पॉट; २०८ ठिकाणी करोनाचे रुग्ण

जीएमसीच्या प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीन अहवालात स्पष्ट; नव्या बाधितांमध्ये बहुतांशी तरुण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यात सुमारे २०८ ठिकाणी सध्या करोनाचे रुग्ण आहेत. त्यातील दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी १० याप्रमाणे सुमारे २० ठिकाणी प्रथमच रुग्ण आढळले आहेत, जे ‘हॉटस्पॉट’ म्हणून अधोरेखित केले आहेत.

प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीन अहवाल

गोव्यातील कोविडचे विश्लेषण करणाऱ्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांनी तयार केलेल्या अहवालात गोव्यातील २० भाग हे नवे हॉटस्पॉट असल्याचं म्हटलं आहे. अर्थात गुलाबी रंगाचे हे भाग अहवालात अधोरेखित केले आहेत.

हेही वाचाः कंटाळलात का कोरोनाला ? चला मग ‘व्हॅक्सिन टुरिझम’ला !

दोन्ही जिल्ह्यांत २० नवे हॉटस्पॉट

उत्तर गोव्यात बांबोळी, खोर्ली, थिवी, कालवी, सांतिनेज, फोंडा कँप, तिस्क, कळंगुट आणि आल्त पर्वरी या दहा भागांत, तर दक्षिण गोव्यात फातोर्डा, कुडचडे, घोगोळ, फोंडा, आके, माशेल, झुवारीनगर, गांधी मार्केट कॉम्प्लेक्स, कवळे हे भाग सध्याचे हॉटस्पॉट आहेत.

हेही वाचाः वॉर्डबाहेर काढल्याने गोमेकॉत बाधितांच्या नातेवाईकांचा गोंधळ

नव्या बाधितांमध्ये बहुतांशी तरुण

हा अहवाल १७ रोजीचे रुग्ण किंवा कोविडसंबंधी मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. अहवालानुसार उत्तर गोव्यात १११ ठिकाणी तर दक्षिण गोव्यात ९७ ठिकाणी कोविडचा संसर्ग आहे. त्यात वरील २० जागा या सध्याच्या हॉटस्पॉट आहेत. या अहवालानुसार गोव्यातील तरुण वर्गाला कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे. ८ ते १३ मे दरम्यान सापडलेल्या काही कोविड बाधितांचा विश्लेषणात समावेश आहे. अहवालात वयोगटाविषयी कुठलाच निष्कर्ष नाही. पण अहवालातील कोविडबाधितांचे वय पाहिल्यास बहुतांश कोविडबाधित हे ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!