20 मे रोजी शालेय शिक्षण मंडळाचा 10 वीचा निकाल होणार जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, 19 मे पणजी : शालेय शिक्षण मंडळातर्फे एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 20 मे शनिवारी दुपारी 4.30 वाजता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये जाहीर करणार आहेत. दोन सत्रांच्या परीक्षेसाठी 20,476 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

पर्वरी शिक्षण संचालनालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी घोषणा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी केली. शालेय मंडळाने यंदा दोन सत्रात नववीची परीक्षा घेतली होती. 10 ते 29 नोव्हेंबर दरम्यान पहिल्या सत्राची परीक्षा झाली 1 ते 24 एप्रिल दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा झाली आणि सदर परीक्षा ३१ केंद्रांवर घेण्यात आल्या. दोन्ही परीक्षांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जाईल. शाळा मंडळाच्या वेबसाइटवर निकाल उपलब्ध होतील. 22 मे नंतर, मार्कशीट शाळेच्या लॉगिनवर वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

म्हापसा, डीचोली , मडगाव आणि फोंडा या चार ठिकाणच्या शाळांनाही गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत. 2022 मध्ये 9वीच्या परीक्षेला 20,345 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18,869 विद्यार्थी 92.75 टक्के निकालासह उत्तीर्ण झाले.