कामुर्लीत २.१० लाखांचे ड्रग्ज जप्त

काेलवाळ पाेलिसांची कारवाई

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कामुर्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाई अंतर्गत कोलवाळ पोलिसांनी विजय प्रदीप वळवईकर (२३, कातुर्ली वाडा-कामुर्ली) याला अटक केली आहे. संशयिताकडून ५१० ग्रॅम गांजा आणि १५.१० ग्रॅम एक्स्टसी पावडर  मिळून २ लाख १० हजारांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत.

हेही वाचाः ‘भारतीय पॅनोरमा’साठी प्रवेशिका पाठवण्याचं ‘ईफ्फी’चं आवाहन !

मंगळवारी पहाटे केली कारवाई

काेलवाळ पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई मंगळवार २७ रोजी पहाटे करण्यात आलीये. ड्रग्सची विक्री करण्यासाठी संशयित आराेपी कामुर्ली फेरी धक्क्याजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रितेश मडगांवकर, हवालदार रुपेश कोरगांवकर, कॉन्स्टेबल संतोष नार्वेकर, अनिषकुमार पोके आणि सुलेश नाईक या पथकाने सापळा रचला आणि संशयित विजय वळवईकर याला ताब्यात घेतलं.

हेही वाचाः ‘गोवन वार्ता लाईव्ह’ला रिकार्डो यांची Exclusive प्रतिक्रिया; निवडणूक लढवण्यावर म्हणाले की..

एकूण २ लाख १० हजारांचे ड्रग्स जप्त

संशयिताची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५० हजारांचा ५१० ग्रॅम गांजा आणि १ लाख ६० हजारांची १५.१० ग्रॅम एक्स्टसी पावडर सापडली. एकूण २ लाख १० हजारांचे ड्रग्स पाेलिसांनी जप्त केलेत. पाेलिसांनी संशयिताविरुद्ध अमली पदार्थप्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Power Debate | डिबेटमधून गोंयकरांच्या वाट्याला काय आलं?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!