मोठी बातमी! तिळारी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार, सतर्कतेचा इशारा

डिचोलीतील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे एकीकडे राज्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे धरणंही तुडुंब भरली आहे. दरम्यान, आता राज्यातील नद्या आणखी प्रवाही होण्याची शक्यता आहे. कारण अंजुणे धरणानंतर आता तिळारी धरणातूनही कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे.

पाणी पातळीत वाढ

मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरणं तुडुंब भरली आहे. काही दिवसांपूर्वीच तिळारी धरणाच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीची आकडेवारीही समोर आली होती. तिळारी धरण ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याचं समोर आलं होतं. अशातच आता मुसळधार पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्यामुळे धरणं काठोकाठ भरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांकडून खबरदारीची पावलं उचलली जात आहेत.

काळजी घ्या

डिचोलीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिळारीतील धरणातून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साळ, पुर्नवसन, मेणकुरे तसेच शापोरा नदीकिनारी वसलेल्या गावांना आताच सतर्कतेचा इशारा आला आहे. त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांनी नदीत जाऊ नये, असंही आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे गरज भासल्यानं ०८३२२३६२२३७ या नंबरवर मदतीसाठी संपर्क करण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचा : तिळारी धरण तुडुंब भरलं!

हेही वाचा : ChiplunFlood | महापुराने चिपळूण बस स्टँडसह एसटीही पाण्याखाली

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अंजुणे धरणातूनही पाणी सोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राज्यात दुसरीकडे गुरुवारी देण्यात आलेल्या रेड अलर्टनुसार मुसळधार पाऊस झाला. तर दुसरीकडे येत्या ४८ तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इकडे कोकणातही मुसळधार पाऊस झाला असून सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. तर म्हादई नदीही दुथडी भरुन वाहू लागली असून सत्तरीतील काही गावांचा वाळपईशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्व आत्पकालीन यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

हेही वाचा : मुंबई गोवा महामार्ग ठप्प; कणकवलीत वागदेजवळ हायवेवर पाणीच पाणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!