Video | ‘ट्रोजन डिमेलो यांचा आवाज काढून माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं कारस्थान रचलं गेलंय’

व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश चोडणकरांचं स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा क्षेत्रफळानं लहान असल्यानं इथं लगेच गोष्टी व्हायरल होतात. अशीच एक गोष्ट रविवारी म्हणजे ८ ऑगस्टल व्हायरल झाली. एक ऑडिओ क्लिप रविवारी अनेकांच्या व्हॉट्सअपवर धडकली. यात गिरीश चोडकरांबद्दल आक्षेपार्ह आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला ही ऑडिओ क्लिप ट्रोजन डिमेलो यांची असल्याचं सांगत फॉरवर्ड होऊ लागली होती.

हेही वाचा – काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामनो! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचे काँग्रेसला ३ सवाल

नेमकं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं?

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसा भ्रष्टाचार आणि सेटिंग करत आहेत, याबद्दल खुद्द पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो सांगत असल्याचं भासवत एकच खळबळ उडाली होती. फक्त इथपर्यंत हे आरोप थांबले नाहीत. पुढे गिरीश चोडकरांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी उमेदवार श्रीपाद नाईकांशी हातमिळवणी केल्याचाही आरोप करण्यात आला. तसंच मांद्रे पोटनिवडणुकीवेळी सचिन परब आणि रमाकांत खलपांना उमेदवारी नाकारतून मुद्दात कमजोर असलेल्या बाबी बागकरांनी उमेदवाली दिल्याचंही ऑडिओ क्लिपमध्ये आढळून आलंय. इतकंच काय तर चोडणकर आणि विरोधी पक्षनेते हे दोघंही मिळून सेटिंग करत असल्याचाही सनसनाटी आरोप या व्हायरल क्लिपमध्ये करण्यात आला होता. यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा – Video | FREE AMBULANCE | कुडचडे काँग्रेसचे नेते अमित पाटकर संतप्त

आरोप फेटाळले!

अखेर या सगळ्यावर गिरीश चोडणकरांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मात्र आपल्यावर सगळे आरोप फेटाळून लावलेत. ऑडिओ क्लिपमधील आवाज ट्रोजन यांचा नाही, असं त्यांनी म्हटलंय. कुणीतल ट्रोजन डिमेलो यांची मिमिक्री करत आवाज डब केल्याचा आरोप चोडणकरांनी केलाय. स्वतः ट्राजन डिमेलो यांच्याशी आपण याबाबत विचारणा केली असल्याचंही गिरीश चोडणकर म्हणालेत. या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी, असंही ते म्हणालेत. दरम्यान, कायदेशीर सल्ला घेऊन याबाबत तक्रार नोंदवली जाईल, असंही गिरीश चोडणकर यांनी नमूद केलंय. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप काँग्रेससाठी रविवारी डोकेदुखीचा विषय ठरलीये.

पाहा व्हिडीओ –

आपचे माजी निमंत्रक एल्विस गोम्स यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या इनकमिंग आणि आउटगोईंगला वेग आलाय. गोम्स यांच्या पक्षप्रवेशावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर सविस्तर भाष्य केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!