ब्रेकिंग! गोव्यात जमावबंदीचा आदेश! वाढत्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत वाढ

राज्यातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची चिंता वाढवणारी आकडेवारी शनिवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नव्या तब्बल १७० रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजधानी पणजीतील सक्रिय रुग्णांची संख्याही तब्बल १७८वर पोहोचल्यानं आरोग्य यंत्रणेची आव्हानंही वाढली आहे.

महत्त्वाचं म्हणजे राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि उत्तर गोव्यात कलम १४४ लागू करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्यानंच गोव्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जमावबंदीचा आदेश देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता शिमगोत्सवात कलम १४४चं पालन होतं का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचंय.

हेही वाचा – चिंताजनक! राजधानीत कोरोनाचा वाढता प्रसार

शहरी भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरतेय. राजधानीतील कोरोना रुग्णसंख्येनं १७८चा स्तर गाठलाय. तर कांदोळी, पर्वरी, मडगाव, वास्को आणि फोंड्यामध्येही रुग्णसंख्या शंभरावर पोहोचल्यानं चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा – सर्व आमदारांनी कोरोना टेस्ट करा, विधिमंडळ सचिवांचे आदेश

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही मोठी डोकेदुखी ठरतेय. शनिवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत भर पडली असून आता सक्रिय रुग्णांचा आकडा १ हजार ३००च्या पार गेलाय. सध्या राज्यात १ हजार ३७९ सक्रिय रुग्ण असून लवकरच हा आकडा चौदाशेच्या पार जाईल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – सूर्य पुढचे काही दिवस आग ओकणार! काळजी घ्या, कारण…

देशासह गोवा राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्येनं पुन्हा एकदा मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आणि सलग जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येनं कोरोना रुग्णसंख्या आणखी वाढेल, अशी दाट भीती व्यक्त केली जाते आहे. त्यातच वाढलेल्या तापमानानंही अनेकांना हैराण केलं आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या प्रकृतीत बिघाड झालाय. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!