नशीब! रस्ता वाहून गेला तेव्हा कोणतं वाहन जात नव्हतं…

बेळगाव-पणजी महामार्ग क्रं.४ ए ठप्प!

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव-पणजी महामार्ग क्रमांक ४ ए वर जुना पूल वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा ब्रिटिशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याला मोठं भगदाड पडल्यासारखं झालंय. रस्त्याचा एक भाग आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहून गेलेला जुना पूल कोसळल्याने शनिवारी दुपारी बेळगाव-पणजी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गा क्रमांक चारवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली आहे.

हेही वाचा : Video | CYCLONE | मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या तरुणाचा चित्तथरारक अनुभव

मुसळधार पावसाचा कहर

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत रामनगर-लोंढा भागात मुसळधार पाऊस सुरू होता. या मुसळधार पावसानं पंढरी नदीला पूर आला. पंढरी नदीच्या पुराच्या पाण्यात शनिवारी पहाटेच्या दरम्यान ब्रिटीश कालीन पूल कोसळला. पूल कोसळल्याने बेळगांव ते रामनगरमधील संपर्क पूर्णपणे तुटलाय. गोवा, रामनगर आणि जोयडा तालुक्यातून जाणाऱ्या लोकांना आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. लोंढा, खानापूर आणि बेळगावला जाण्यासाठी अलनावरमार्ग पत्करावा लागल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल झालेत.

हेही वाचा : Video | थरारक | अडीच तासापर्यंत सुरू होते सिलिंडरचे स्फोट

आता वळसा!

“हा एकमेव पूल जो बेळगांव जिल्ह्याला जोयडा तालुक्याशी जोडत होता. गोव्याहून बेळगांव -खानापूरकडे जाणारी वाहने एकतर हेम्मडागामार्गे अनमोड-खानापूर रस्त्याने जात असता. हा मार्गही अरुंद व जीर्ण अवस्थेत आहे. नाहीतर लोकांना अलनावरमार्गे सुमारे 25-30 कि.मी. अंतर जास्त प्रवास करावा लागतो, असं एका स्थानिकानं सांगितलंय. पर्यायी पूल जो निर्माणधीन आहे तो अपूर्ण असून ठेकेदाराने हे काम NH 4A वर सोडलंय. म्हणूनच, नवीन पूल तयार होईपर्यंत वरील भागातील संपर्क पूर्णपणे तुटलाय आणि प्रवाशांना खानापूर व बेळगावपर्यंत जाण्यासाठी एकतर हेम्मडामार्गे जीर्ण झालेल्या रस्त्यावरुन किंवा अलनावर मार्गे जावं लागणार आहे.

दरम्यान, पंढरी नदीला पूर आल्याने रेल्वे स्थानकाशेजारील लोंढा गावच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात घरं बुडाली आहेत. शुक्रवारी एनडीआरएफ टीम आणि पोलिसांनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीची सुटका केली होती.

हेही वाचा : VIDEO | अंगावर काटा आणणारा अपघात! गोंयकार कुटुंबाला एक्स्प्रेस वेवर कंटेनरने चिरडलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!