15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

डिचोलीतील मुस्लिमवाडामधून १९ वर्षीय तरुणाला बेड्या

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोली : डिचोली परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. डिचोली पोलिसांनी मुस्लिमवाडा, डिचोली येथील अरमान खान या १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा उलगडा बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयातून झाला.

गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

डिचोली परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचा वायरलेस संदेश डिचोली पोलिसांना आला होता. त्यावरून डिचोली पोलिसांनी चौकशी सुरू केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने डिचोली पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलीचीही सखोल चौकशी केली. या चौकशीत पीडित मुलीने संशयित युवक अरमान खान याचं नाव उघड केलं.

हेही वाचा : मोठी कारवाई! तब्बल 50 लाख रुपये किंमतीचा तांदूळ जप्त, तारीख बदलून केली जात होती विक्री

हेही वाचा : धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला अटक

चौकशी सुरु

पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, डिचोली पोलिसांनी अरमान खान याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान गेल्या सहा सात महिन्यांपूर्वी सदर पीडित मुलीचं लैंगिक शोषण केल्याची त्याने कबुलीही दिली. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला आज (शनिवार, २६ जून) डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयासमोर संशयित आरोपी असलेल्या तरुणाला सादर करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मनिषा पडणेकर अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : VIDEO | पादचाऱ्याचा निष्काळजीपणा नडला; भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने उडवलं

हेही वाचा : मुली असुरक्षितच! 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापानं केला बलात्कार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!