15 व्या वित्त आयोगाकडून राज्याला 176 कोटी मंजूर

पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी निधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी पाणी आणि स्वच्छतेसाठी १,४२,०८४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केलं आहे.

हेही वाचाः अपघात वाढले, पण मृत्यू होण्याचं प्रमाण घटलं!

गोव्यासाठी १७६ कोटी मंजूर

अनुदानाचा पहिला हप्ता संस्थांना हस्तांतरित करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गोव्यासाठी १७६ कोटी मंजूर केले असून २०२१-२२ साठी ३४ कोटींचा पहिला हप्ता मिळणार आहे. उर्वरित निधी टप्याटप्प्याने दरवर्षी रक्कम दिली जाणार आहे. खेड्यांना, ग्रामपंचायतींना त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पावसाचं पाणी साठवणं आणि पाण्याचा पुनर्वापर यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.

पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी निधी

तसेच स्वच्छता आणि उघड्यावरील शौचमुक्त गाव करण्यासही मदत मिळणार आहे. पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी हा निधी देण्यात येत असल्याची माहिती केंद्राने दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Crime | Girls Safety? | युवतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!